Type to search

हिट-चाट

वडील संदीप पाटील यांची भूमिका करण्यास चिराग सज्ज; ‘८३’ लूक झाला वायरल

Share
वडील संदीप पाटील यांची भूमिका करण्यास चिराग सज्ज; '८३' लूक झाला वायरल, 83 marathi movie chirag patil look viral

‘वजनदार’ या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारा हॅण्डसम अभिनेता चिराग पाटील आता बॉलिवूडच्या पीचवर षटकार ठोकायला सज्ज झाला आहे.

१९८३ विश्वचषक स्पर्धेवर आधारित ‘८३’ या चित्रपटातून तो प्रेक्षकांसमोर येणार आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात तो त्याचे वडील तसेच ८३ विश्वचषक विजेत्या भारतीय संघांतील शिलेदार क्रिकेटपटू संदीप पाटील यांची भूमिका साकारणार आहे.

नुकताच या सिनेमातील चिरागचा पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘लूक अ लाईक संदीप पाटील’ दिसणाऱ्या चिरागचा हा पोस्टर नेमका मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावरच प्रदर्शित झाला असल्याकारणामुळे दिवसाची सुरुवात गोड ने झाली आहे.

या चित्रपटात मुख्य भूमिका रणबीर सिंग साकारत आहे. तरी, प्रेक्षकांसाठी चिरागला वडील संदीप पाटील यांच्या भूमिकेत पाहणे रंजक ठरणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!