राज्यात 82 हजार 198 शेततळ्यांना मंजुरी

0

आमदार कोल्हेः भाजपाची अडीच वर्षात शेतकर्‍यांना भरभरून मदत

कोपरगाव (प्रतिनिधी)- राज्यातील युती शासनाने अडीच वर्षात दमदार कामगिरी करून पीकविम्यात 6 हजार 739 कोटी रूपयांचे वाटप दुष्काळमुक्त महाराष्ट्र जलयुक्त शिवार करण्यांत 11 हजार 492 गावात 4 हजार 178 कोटी 59 हजार 348 विहीरींचा लाभ मागेल त्याला शेततळे योजनेत 27 हजार शेततळी पुर्ण तर 82 हजार 198 शेततळ्यांना मंजुरी दिली असल्याचे प्रतिपादन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.
शासनाच्या शिवार संवाद सभेचे तालुक्यातील शेतकर्‍यांच्या बांधावर ठिकठिकाणी आयोजन करण्यांत आले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. डाउच खुर्द, संवत्सर, धोत्रे, करंजी, धामोरी, टाकळी, जेउरपाटोदा, कुंभारी, मंजुर आदी गावातील शेतकरी याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार स्नेहलता कोल्हे म्हणांल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी केंद्रीभूत मानून अडीच वर्षात त्यांच्या विकासासाठी शासनांच्या तिजोरीतुन कोट्यावधी रूपये खर्च करून त्यांची प्रगती साधली आहे. तर याउलट आघाडी शासनांने पंधरा वर्षात शेतकर्‍यांना अगदीच नगण्य मदत करून त्यांचे पाटपाण्यांचे प्रकल्प रखडवलेले आहे.
2 लाख 75 हजार शेतकर्‍यांना वीजजोडणी, 28 लाख 20 हजार 378 माती परिक्षण, खतांच्या किंमती पाच वर्षे स्थीर, 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 1400 कोटी रूपयांचे स्वस्त धान्य वाटप, साडेचार लाख शेतकर्‍यांना 600 कोटी रूपयांचे वैद्यकिय उपचार, 57 लाख शेतकर्‍यांना 42 हजार कोटींचे कर्ज वाटप, गोपिनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजना भरपाई रक्कमेत एक लाखाने वाढ, अचुक हवामानाच्या अंदाजासाठी 2 हजार 65 हवामान केंद्रे, उन्नत शेती समृध्द शेतीसाठी 3 लाख शेतकर्‍यांना प्रशिक्षण आदी भरघोस कामगिरी युती शासनांने केली आहे.

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी शासनास देखील तीन वर्षे पुर्ण झाली आहेत. त्यांचीही कामगिरी सर्वोत्तम आहे. त्यामुळे विरोधकांची पळता भूई थोडी झाली आहे. सबका साथ सबका विकास अंतर्गत अच्छे दिन आणण्यांचे काम युती शासनांने केले आहे.

LEAVE A REPLY

*