Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिक : ८१ रुग्णांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह; १५५ प्रलंबित

नाशिक : ८१ रुग्णांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह; १५५ प्रलंबित

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येक कमालीची वाढ झाली आहे. आतापर्यंत ३३ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामध्ये एक कोरोनामुक्त झाला आहे तर मालेगाव येथील बाधिताचा मृत्यू झाला आहे. नाशिकमधून पुणे आणि धुळे येथे संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये आज ८१ नमुने प्राप्त झाली असून सर्व निगेटिव्ह आले आहेत. अद्याप १५५ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

- Advertisement -

यातील काही अहवाल आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळपर्यंत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोरोनाबाधित देशातून नाशिक जिल्ह्यात आलेले व पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेले नागरिक एक हजार 62 आहेत. यामध्ये ३२३ जणांना होम क्वारंटाईन केले आहे. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात एकूण ५९८ जणांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. यामध्ये ४१२ निगेटिव्ह आले आहेत तर ३३ रुग्ण पाझिटिव्ह आले आहेत.

अद्याप १५५ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत यामध्ये धुळ्यातून ७३ अहवाल, पुण्यातून ८२ अहवाल येणे बाकी आहेत.  नाशिकमध्ये दाखल झालेल्या संशयितांमध्ये जवळपास २९६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्याच्या परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातील विविध रुग्णालयात एकूण १४१ जणांवर उपचार सुरु आहेत. यात नाशिक जिल्हा रुग्णालयात  ३४, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ३९, मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात ६८ तर अपोलो रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरु आहेत. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार एकूण आठ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.’

दरम्यान, आजच्या अहवालातून हेच सिद्ध होते की, नाशिकमध्ये कोरोनाचे सामुदायिक संसर्ग झालेले नाही. त्यामुळे येणारे अहवाल महत्वाचे असतील असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले.

या रुग्णालयातील संशयित आले आहेत निगेटिव्ह

नाशिक जिल्हा रुग्णालय : १३

सामान्य रुग्णालय मालेगाव : ३४

सह्याद्री आणि सुयश हॉस्पिटल : ०२

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय : ३२

एकूण : ८१ रुग्ण निगेटिव्ह

- Advertisment -

ताज्या बातम्या