Saturday, April 27, 2024
Homeनाशिकनाशिक शहरात एकाच दिवशी 81 संशयित रुग्णालयात; अति जोखमीच्या व्यक्तींत वाढ

नाशिक शहरात एकाच दिवशी 81 संशयित रुग्णालयात; अति जोखमीच्या व्यक्तींत वाढ

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरातील करोना बाधीतांच्या आकड्यात गेल्या दोन दिवसात केवळ एकने भर पडली असुन बाधीतांचा आकडा 39 पर्यत स्थिरावला असल्याने नाशिककरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्या 27 असुन याभागातील करोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अति जोखमीच्या व्यक्तींची संख्या 166 वरुन 173 इतकी झाली आहे. दरम्यान दोन दिवसात करोना बाधीत आढळले नसले तरी सोमवारी (दि.11) एकाच दिवशी महापालिका व खाजगी रुग्णालयात 81 संशयित दाखल झाले आहे.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील करोना बाधीतांचा आकडा 693 पर्यत गेला असुन आत्तापर्यत 72 जण बरे होऊन घरी पोहचले आहे. बाधीतात मालेगांव महापालिकेतील आकडा 547 पर्यत गेला आहे. तसेच नाशिक शहरातील आकडा 39 इतका असुन सोमवारपर्यत 9 जण बरे होऊन घरी गेले आहे. नाशिक शहरात महिनाभरात करोनाची 27 प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर झाले आहे. करोना बाधीत भागातून आलेल्याची संख्या 1248 झाली असुन यातील 815 जणांचा देखरेखीखालील 14 दिवसाचा कालावधी पुर्ण झाला आहे.

आत्तापर्यत शहरातील रुग्णालयात 1027 संशयितांना दाखल करण्यात आल्यानंतर उपचार झाल्यानंतर 895 जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. सोमवारपर्यत मनपा रग्णालय व खाजगी रुग्णालयातील संशयितांच्या घशातील स्त्रावाचे पाठविण्यात आलेल्या (महापालिका, खाजगी रुग्णालयातील व मनपा क्षेत्राबाहेरील )1103 नमुन्यापैकी 881 अहवाल निगेटिव्ह आले आहे. मंगळवारपर्यत शहरातील 27 प्रतिबंधीत क्षेत्रात करोना बाधीतांच्या संपर्कात आलेल्यात 174 अति जोखमीच्या आणि 643 कमी जोखमीच्या व्यक्ती चौकशीत समोर आल्या आहे.

शहरात 27 प्रतिबंधीत क्षेत्रातील आजची स्थिती

(कंसात अति जोखमीच्या व्यक्ती, कमी जोखमीच्या व्यक्ती व करोना रुग्ण )

  • गोविंदनगर (0) (21) (1),
  • नवश्या गणपती (0) (10) (1)
  • धोंगडेनगर (0) (38) (2)
  • बजरंगवाडी (0) (12) (1)
  • संजीवनगर (0) (105) (5)
  • म्हसरुळ वृंदावनगर (5) (27) (1)
  • सावतानगर (न. ना.) (8) (0) (1)
  • उत्तमनगर (न. ना.) (19) (7) (1)
  • पाथर्डी फाटा मालपाणी सेफ्रॉन (7) (18) (2)
  • सातपूर कॉलनी (25) (220) (8)
  • वृंदावन कॉलनी जनरल वैद्यनगर (5) (22) (1)
  • बजरंगवाडी (भाग दुसरा) (18) (20) (1)
  • शांतीनिकेतन चौक (2) (23) (1)
  • माणेक्षानगर द्वारका (6) (20) (1)
  • समतानगर टाकळीरोड (2) (13) (1)
  • पाटीलनगर (3) (11) (2)
  • हनुमान चौक (29) (13) (1)
  • जाधव संकुल (0) (14) (1)
  • हिरावाडी (3) (0) (1)
  • श्रीकृष्ण कॉलनी (4) (1) (1)
  • इंदिरानगर (13) (16) (1)
  • तारवालानगर (9) (21) (1)
  • आयोध्यानगरी हिरावाडी (1) (0) (0)
  • कोणार्कनगर – 2 (1) (0) (1)
  • सागर व्हिलेज धात्रक फाटा (1) (0) (1)
  • हरिदर्शन अर्पा. धात्रक फाटा (4) (0) (1) आणि सिन्नर फाटा ना. रोड (8) (11) (1).

नाशिक मनपा करोना स्थिती…

* एकुण पॉझिटीव्ह – 39
* पुर्ण बरे झालेले – 9
* मृत्यु – 2
* उपचार घेत असलेले – 231
* प्रलंबीत अहवाल – 122

- Advertisment -

ताज्या बातम्या