8 दिवसात 4 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

0

जिल्हा परिषदेकडून सुचना : लोकसहभाग घेण्याचे गटविकास अधिकार्‍यांना आदेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- यंदा 50 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात पावसाळ्यात जिल्ह्यासाठी 4 कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. लागवडीच हे उद्दिष्टे 1 ते 7 जुलै या कालावधीत हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. वृक्ष लागवड हा कार्यक्रम केवळ सरकारी कार्यक्रम न राहाता स्वयंसेवी संस्था, रोटरी क्लब, नाम फौंडेशन, श्रीश्री रविशंकर यांचे अनुयायी, पतंजली आदी संस्था, लोकप्रतिनिधी, जनता यांना या कार्यक्रमात समावून घेण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी गट विकास अधिकारी यांना दिले आहेत.
9 मे रोजी राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाकडून 50 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात नगरच्या कामगिरीची माहिती घेतली. यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे यांनी गट विकास अधिकार्‍यांना आदेश काढून वृक्ष लागवड कार्यक्रमाबाबत घ्यावाच्या काळजीबाबत सुचना दिल्या आहेत.
हा कार्यक्रम सरकारी कार्यक्रम ठरू नये, यासाठी लोकसहभाग वाढून जनतेची पर्यायवरण विषय जागृता वाढावी आणि वृक्ष लागवड चळवळ उभी राहावी, राज्यात हरितसेनेची स्थापना करण्यात आली असून यात 1 कोटी जनतेला सदस्य करण्यात येणाार आहे. प्रत्येक कुटूंबाने मुलाच्या जन्मानंतर किमान दोन झाडे लावावीत, विद्यार्थीचे शाळेतील पहिले पाऊल वृक्ष लावून करण्यात यावे, स्वयंसेवी संस्था, रोटरी क्लब, नाम फौंडेशन, श्रीश्री रविशंकर यांचे अनुयायी, पतंजली आदी संस्था, लोकप्रतिनिधी, जनता यांना या कार्यक्रमात समावून घेण्यात यावे.
गतवर्षी लागवड करण्यात आलेल्या वृक्षाचे संवर्धन आणि संगोपन करण्यात यावे. यासाठी प्रत्येक झाडा जवळ पाण्याची बाटली लावण्यात यावी, त्या बाटलीव्दारे दररोज संबंधीत झाडाला पाणी देण्यात यावे, झाडाच्या संरक्षणासाठी ट्रिगार्ड बसवण्यात यावे, राष्ट्रीय रस्ता, गावातंर्गत रस्ते, रेल्वे लाईन परिसारात वृक्ष लागवड करण्यात यावी आदी सुचना देण्यात आल्या आहेत.

 वृक्ष लागवड कार्यक्रमात प्रामुख्याने चिंच, वड, आंबा,  पिंपळ या वृक्षांना प्राधन्य देण्याचे सुचना जिल्हा परिषदेकडून देण्यात आल्या आहेत. लागवडीसाठी प्रत्येक जिल्ह्याला 29 मे पूर्वी खड्डे खोदण्याचे लक्षांक पुर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली. 

LEAVE A REPLY

*