791 कृषिमित्रांची होणार निवड

0
अहमदनगर (प्रतिनिधी) –  कृषी विभाग राज्य शासन व शेतकर्‍यांचा दुवा म्हणून काम करण्यासाठी आत्मा विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात तब्बल 791 कृषिमित्रांची निवड करण्यात येत आहे.
नियुक्त कृषिमित्राला मासिक 500 असे एकूण वार्षिक सहा हजार रुपये मानधन मिळणार आहे. दोन वर्षातून एकदा निवड केली जाते.
जिल्ह्यात सुमारे एक हजार 600 महसूली गावे आहेत. दोन गावे मिळून एक कृषिमित्र निवडला जाणार आहे. ग्रामसभेत सदर निवड करण्यात येणार आहे. संबधित कृषिमित्राला शेतीची आवड, वेळ देण्याची तयारी, स्वत:ची शेती प्रगतिशील शेती असणे अपेक्षित आहे.
कृषी विभागाने आयोजीत केलेल्या विविध कार्यशाळांची माहिती शेतकर्‍यांपर्यत पोहचविणे, शेतीविषयक अडचणींची सोडवणूक करणे, संबधित कार्यक्षेत्रातील शेतकरी गट व कंपन्यांशी समन्वय साधून त्यांना अधिक चालना देण्याचा प्रयत्न करणे आदी. शेतकर्‍यांच्या फायद्याच्या कृषीच्या विविध योजनांची हायटेक प्रचार-प्रसिध्दी करणे, शेतकर्‍यांशी संवाद वाढवून योजनांनी गती देण्याच काम कृषिमित्रांचे असणार आहे.

ग्रामसभा करणार निवड ग्रामसभा करणार निवड  दोन गाव मिळून एक याप्रमाणे जिल्ह्यात 791 जणांची निवड ही ग्रामसभा करणार आहे. त्यासाठी पंधरा दिवसांत विशेष ग्रामसभा बोलावून निवड होणे अपेक्षित आहे. मानधनासाठी भारत सरकारकडून 47 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बर्‍हाटे यांनी दिली.

LEAVE A REPLY

*