Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

स्टेट बँकेच्या एटीएममधून 79 लाख लंपास

Share

नगर टाइम्स

अहमदनगर (प्रतिनिधी) – एटीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड करून स्टेट बँकेच्या एटीएम मशीनमधून रोकड लुटीचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. सलग तिसरी फिर्याद बँकेच्या अधिकार्‍यांनी पोलिसांत दाखल करत आणखी 47 लाख रुपये लुटल्याचे म्हटले आहे. आतापर्यत स्टेट बँकेचे झेंडीगेट, मल्हार चौक, माळीवाडा, सर्जेपुरा आणि जीपीओ चौकातील एटीएममधून 78 लाख 87 हजार रुपये लंपास करण्यात आल्याचे उजेडात आले आहे.

स्टेट बँकेच्या चांदणी चौकातील मुख्य शाखेच्या एटीएममधून 18 लाखाची लूट झाल्याचा पहिला गुन्हा दाखल होताच पोलिसांनी एका महिलेसह तिघांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर युपीपर्यंत त्याची लिंक पोहचली. आणखी काही आरोपींना अटक करणे बाकी असले तरी आरोपींच्या चौकशीत लुटीची दिवसागणिक वाढतच आहे.

तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्जेपुरातील एटीएममधून सुमारे साडेबारा लाख रुपये लुटण्यात आले. त्यानंतर आणखी काही प्रकार समोर आले आहेत. झेंडीगेट, मल्हार चौक आणि माळीवाडा भागातील स्टेट बँकेच्या एटीएममधून 47 लाख 30 हजार रुपये लंपास झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

तशी तिसरी अन् स्वतंत्र फिर्याद बँकेचे अधिकारी राधेशाम इंजेवार यांनी पोलिसांत दिली आहे.
विरेंद्र यादव, श्‍वेता कमलेश सिंग आणि पवन अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांनाही भिंगार पोलिसांनी मोठ्या शिताफिने अटक केली आहे.

तोफखान्यानंतर आता कोतवाली..
भिंगार, तोफखान्यानंतर आता कोतवाली पोलिसांत तिसरा गुन्हा दाखल झाला. भिंगार पोलिसांच्या चौकशीनंतर अटकेतील तिघांना तोफखाना पोलिस त्यांच्याकडील गुन्ह्यात वर्ग करून घेणार आहेत. तोफखान्याच्या चौकशीनंतर आता कोतवालीत नव्याने दाखल झालेल्या गुन्ह्यातही आरोपींनी वर्ग करून घेतले जाणार आहे. भिंगार पोलिसांच्या चौकशीत दोन गुन्हे उघडकीस आले आता तोफखाना अन् कोतवाली पोलिसांच्या चौकशीत कोणते अन् किती गुन्हे उघडकीस येतात याकडे अनेकांच्या नजरा लागून आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!