77 गावांत निवडणुकीचा धुराडा

0

आजपासून अर्ज दाखल, इच्छुकांची कागदपत्रांची जुळवाजुळव

अहमदनगर (प्रतिनिधी)– राज्य निवडणूक आयोगाने अहमदनगर जिल्ह्यातील माहे जून 2018 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणार्‍या 77 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडर कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी आज 7 मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होत आहे. या पार्श्‍वभूमिवर इच्छुक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात व्यग्र आहेत. सरपंच पदासाठी अनेकांनी व्यूहरचना केली आहे.

संगमनेेरातील घारगाव, श्रीरामपुरातील नाऊर, दिघी, राहुरीतील बारागावनांदूर, धामोरी, ब्राम्हणी, देसवंडी, नेवाशातील भानसहिवरा, मुकिंदपूर. पारनेरातील कान्हूरपठार, वाडेगव्हाण यासह 77 ग्रामपंचायत निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी दिनांक 7 ते 12 मे, 2018 या कालावधीत सकाळी 11 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत आहे. छाननी दिनांक 14 मे 2018 रोजी होणार असून नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक 16 मे असल्याने या दिवशीच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. मतदान 27 मे 2018 रोजी होणार आहे. या निवडणुका राजकीय चिन्हांवर होणार नसल्यातरी काँग्रेस, राष्ट्रवादी,  भाजपा,सेना, रिपाइंं व अन्य पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आपापल्या गावात आपले वर्चस्व अबाधित रहावे यासाठी स्थानिक पुढार्‍यांनीही मोर्चेबांधणी केली आहे.

LEAVE A REPLY

*