Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

एटीएमचे दोन्ही बाजूचे फोटो पाठवणे पडले महागात; महिलेच्या खात्यातून ७४ हजार रुपये काढले

Share

इंदिरानगर | वार्ताहर

विमा पॉलिसी काढून त्यावर चोवीस तासात बारा लाखांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेला चौऱ्याहत्तर हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  दिपाली अनिल कुलकर्णी वय (४३, रा. राणेनगर) यांनी घरी असताना भ्रमणध्वनीवर फोन आला बजाज फायनान्स कंपनी मधून बोलत असल्याचे सांगत कंपनीने नुकतीच नवीन विमा पॉलिसी सुरू केली आहे.

त्यावर आपल्यासाठी चांगली ऑफर आहे, असे सांगत आपण पॉलिसी काढण्यास इच्छुक आहात का? अशी विचारणा केली. होकार दिल्यानंतर काही वेळात दुसऱ्या नंबर वरून फोन आला. कंपनीमधून विक्रम कुमार बोलत असून आपण बारा लाखांची विमा पॉलिसी काढल्यास दरवर्षी एक लाख रुपये भरायचे तसेच या पॉलिसीवर पुढील चोवीस तासात बारा लाख रुपये कर्ज मिळेल असे सांगितले.

सांगत तुम्ही ही पॉलिसी घेण्यास इच्छुक आहात का अशी विचारणा केली त्याच होकार दिल्यानंतर सुरुवातीला पंचवीस हजार रुपये कागदपत्रांची फी म्हणून कापण्यातील येईल व उर्वरित अकरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये २४ तासात आपल्या बँक खात्यात जमा होतील तसेच एटीएम कार्डचा दोन्ही बाजूंचे फोटो व्हाट्सअप नंबर वर पाठवण्यास सांगितले.

विश्वास ठेवल्याने व्हाट्सअप नंबर वर एटीएम कार्ड चा फोटो पाठवला तसेच आयडीबीआय बँकेच्या एटीएम चा ही फोटो पाठवला यानंतर काही वेळातच बँकेतून बोलत असल्याचा फोन आला व ओटीपी नंबरची मागणी केली ओटीपी नंबर देताच युनियन बँकेतील खात्यातून वीस हजार रुपये दोन वेळा व नंतर दहा हजार आणि दोन वेळा पाच -पाच हजार व अखेरीस १४ हजार ९०० रुपये अशी चौऱ्याहत्तर हजारांची रक्कम काढून घेतली.

एवढ्या प्रमाणात रक्कम खात्यातून काढून झाल्यानंतर संशयितांच्या मोबाईल नंबर वर संपर्क साधला असता फोन बंद असल्याचे समजले त्यावरून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसात धाव घेतली. संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक पि. टी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अंकुश दांडगे अधिक तपास करत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!