719 शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी ; कोल्हे

0
दोन वर्षातील  प्रकरणे काढली निकाली
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीचा प्रश्‍न निकाली काढला आहे. दोन वर्षापासून प्रलंबित असणार्‍या 809 शिक्षकांच्या प्रस्तावापैकी पात्र असणार्‍या 719 शिक्षकांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात 2015-16 चे 278 शिक्षकांचे आणि 2016-17 चे 531 वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव पडून होते. शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. या समितीत अध्यक्षा, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक हे सदस्य सचिव आहेत. वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी 12 वर्षे सेवा, 3 वर्षाचे उत्कृष्ठ गोपनीय अहवाल आणि सेवांतर 21 दिवसांचे प्रशिक्षण आवश्यक आहे.
या अटी पूर्ण करणारे शिक्षक हे वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी पात्र आहेत. यामुळे नियमानुसार शिक्षण विभागाने 2015-16 चे 278 पैकी 259 शिक्षकांचे आणि 2016-17 चे 531 पैकी 460 शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हे यांनी या शिक्षकांना वेतनश्रेणी मंजूर केली असून लवकर याबाबतचे आदेश काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*