७/१२ तील त्रुटी सुधारण्यास उद्यापासून प्रारंभ

0
नाशिक | दि. १४ प्रतिनिधी- महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर फडणवीस सरकारने महत्त्वाचा कार्यक्रम हाती घेतला असून सरकारने ७/१२ दुरुस्ती आणि चावडी वाचन विशेष मोहीम सुरू केली आहे. यानुसार अनेक ठिकाणी चावडी वाचणास प्रारंभ झाला आहे. तुमचा ऑनलाईन सात-बारा उतारा http://mahabhulekh.maharashtra.gov.in    संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

उतार्‍यात त्रुटी असल्यास १ मे २०१७ ते १५ मे २०१७ पर्यंत गावातील तलाठ्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते. १५ मे ते १५ जून २०१७ दरम्यान संगणीकृत ७/१२ चे चावडी वाचन करण्याचे योजिले होते. यामध्येही काही आक्षेप असल्यास, गाव तलाठीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते.

उद्यापासून म्हणजेच १६ जून ते ३१ जुलै २०१७ संगणकीकृत ७/१२ मधील माहितीत प्राप्त आक्षेपांचा विचार करून आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात येणार आहे. येत्या १ ऑगस्टपासून तुम्हाला डिजिटल (आधुनिक )स्वरुपात स्वाक्षरीत ७/१२ उपलब्ध होणार आहे. याचे काम युद्धपातळीवर ऑनलाईन स्वरूपात सुरू आहेत.

काही जिल्ह्यात ऑनलाईन सातबारा दिला जात नाही. दफ्तरातील सातबारा आणि संगणकावरील सातबारा यामध्ये थोडी तफावत आहे. यामुळेच सार्वत्रिक ऑनलाईन सात-बारा सध्या उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. ही त्रुटी दूर करण्यासाठीच एडिट मोडूल म्हणजेच सात-बारा दुरुस्तीचे सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

सध्या सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी ऑनलाईन पद्धतीने याच कामात गेल्या दहा महिन्यांपासून व्यस्त आहेत. सर्वच जिल्ह्याची याचे काम ८० % झाली आहेत. काही ठिकाणी अपवाद वगळता सर्वच काम ऑनलाईन झाले आहे. आता तलाठी कार्यालयात वारंवार चकरा मारण्याची वेळ येणार नाही.

ऑनलाईन पैसे देऊन किंवा महा ई- सेवा केंद्रातून डिजिटल सहीचा वैध कायदेशीर सात- बारा मिळेल. शेतकर्‍यांना महा ई- सेवा केंद्र, सायबर कॅफे या ठिकाणी महाभूमिलेख या संकेतस्थळावर आपला सातबारा तपासता येईल. त्यात काही त्रुटी असल्यास तातडीने तलाठ्याच्या निदर्शनास आणून देऊन तो तत्काळ सातबारा दुरुस्त करण्यास मदत होईल.

LEAVE A REPLY

*