जिल्ह्यात 70 गावांत ‘मिनी आमदार’ निवडीसाठी 26 सप्टेंबरला निवडणूक

0

5 सप्टेंबरपासून उमेदवारी, 15 ला माघार

मुंबई- राज्यातील विविध 26 जिल्ह्यांमधील 1 हजार 41 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच 69 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागासांठी 26 सप्टेंबर 2018 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी येथे केली. यात नगर जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. दरम्यान, या 70 गावांमध्ये थेट सरपंच निवडीसाठी मतदान होणार असल्याने राजकीय धुराडा उडणार आहे. पारनेर 2, राहुरी 6, श्रीगोंंदा 2, कोपरगाव 3, नगर 1, जामखेड 4, नेवासा 17, श्रीरामपूर 1, पाथर्डी 10, संगमनेर 1, अकोले 21 आणि शेवगाव 2 गावांचा समावेश आहे.

सहारिया यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदत संपणार्‍या व नवनिर्मित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी हे मतदान होत आहे. यात सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे 5 ते 11 सप्टेंबर 2018 या कालावधीत स्वीकारले जातील. त्यांची छाननी 12 सप्टेंबर 2018 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 15 सप्टेंबर 2018 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी चिन्ह वाटप होईल. मतदान 26 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 27 सप्टेंबर 2018 रोजी होईल.

सार्वत्रिक निवडणूक होणार्‍या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 6, रायगड- 121, रत्नागिरी- 19, सिंधुदुर्ग- 4, नाशिक- 24, धुळे- 83, जळगाव- 6, अहमदनगर- 70, नंदुरबार- 66, पुणे- 59, सोलापूर- 61, सातारा- 49, सांगली- 3, कोल्हापूर- 18, बीड- 2, नांदेड- 13, उस्मानाबाद- 4, लातूर- 3, अकोला- 3, यवतमाळ- 3, बुलडाणा- 3, नागपूर- 381, वर्धा- 15, चंद्रपूर- 15, भंडारा- 5 आणि गडचिरोली- 5. एकूण- 1041.

नेवासा, अकोलेतील सर्वाधिक गावे
जामगाव, वडनेर हवेली (पारनेर). माहेगाव, मालुंजे, मुसळवाडी, टाकळीमियाँ, खूडसरगाव, चिखलठाण (राहुरी). घारगाव, घुटेवाडी, (श्रीगोंदा). गोधेगाव, धामोरी, शिरसगाव (कोपरगाव). बुरूडगाव (नगर). जवळा, फक्रारबाद, हाळगाव, धणेगाव (जामखेड). बेलपांढरी, गिडेगाव, गोमळवाडी, घोडेगाव, जैनापूर, जायगुडे आखाडा, खामगाव, खेडले काजळी, लोहारवाडी, नांदूरशिकारी, पानसवाडी, पाथरवाला, राजेगाव, सौंदाळा, वडुले, वंजारवाडी, झापवाडी, (नेवासा). भामाठाण (श्रीरामपूर). साकेगाव, दगडवाडी, डांगेवाडी, अंबिकानगर, रेणुकाई वाडी, टाकळीमानूर, करंजी, हात्राळ, शंकरवाडी, सैदापूर, (पाथर्डी). सारोळे पठार (संगमनेर). लाडगाव, देवगाव, मुतखेल, वालूंजशेत, रेडे, कोहणे, रतनवाडी, पिंपळदरावाडी, जहागीरदार वाडी, पेढेवाडी, पाचपट्टा वाडी, तिरढे, कुमशेत, पेंडशेत, सुगाव बद्रुक, पाचनई, आंबीत, शिरवद, बारी, साम्रद, कोकणवाडी (अकोले). लाखेफळ, एरंडगाव भागवत (शेवगाव).

LEAVE A REPLY

*