67 ग्रामपंचायतींचा मतदारयादी कार्यक्रम लागू होणार

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – पुढील वर्षी जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील 59 आणि फेबु्रवारी महिन्यात 8 अशा 67 ग्रामपंचायतींची विद्यमान सदस्य मंडळाची मुदत संपणार आहे. या ठिकाणी सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने 14 नोव्हेंबरपासून मतदारयादी कार्यक्रम लागू करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक विभागाला दिले आहेत.
मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात येत आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील 59 आणि फेबु्रवारी महिन्यात 8 अशा 67 ग्रामपंचायतींची विद्यमान सदस्य मंडळाची मुदत संपत आहे.
या ठिकाणी 14 नोव्हेंबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून या ठिकाणी प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यावर 14 ते 20 नोव्हेंबर दरम्यान सूचना हरकती मागवून 24 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
मार्च आणि मे महिन्यांत जिल्ह्यातील 17 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. या ठिकाणी प्रभाग रचना करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार प्रारूप प्रभाग रचना तयार करणे, प्रभागातील मतदार संख्या निश्‍चित करणे आदी कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे.

जानेवारीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायती
अकोले 2, संगमनेर 2, नेवासा 6, पारनेर 1, कोपरगाव 4, राहाता 7, शेवगाव 9, कर्जत 1, श्रीरामपूर 10, राहुरी 6, श्रीगोंदा 5 आणि नगर 5 यांचा समावेश आहे.
फेबु्रवारीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायती
राहाता 1, कोपरगाव 2, शेवगाव 1, नेवासा 1, श्रीगोंदा 3 यांचा समावेश आहे.
मार्च व मेमध्ये मुदत संपणार्‍या ग्रामपंचायती
भैरवनाथनगर, दत्तानगर (श्रीरामपूर), पिंपळकंजुरी (संगमनेर), हिंगणगाव (नगर), पोहेगाव, धोत्रे (कोपरगाव), शहरापूर (नेवासा), जवखेडे खालसा (पाथर्डी), कणकुटी, रुई, पुणतांबा (राहाता), शिरसगाव (राहुरी), थोटे, देवटाकळी, येरंडगाव भागवत, वडुले खु, समसुंद (शेवगाव) यांचा समावेश आहे. 

LEAVE A REPLY

*