65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : कच्चा लिंबू सर्वोत्तम मराठी सिनेमा

0

नवी दिल्ली : 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात येत आहे. नवी दिल्लीतील शास्त्री भवनमध्ये पुरस्कार जाहीर केले जात आहेत. दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांनी ठसा उमटवला आहे. अभिनेता प्रसाद ओकचं दिग्दर्शनातलं पदार्पण असलेल्या कच्चा लिंबू चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. मंदार देवस्थळी निर्मित या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, दिग्दर्शक रवी जाधव यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.

शुक्रवारी 65 व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यावेळी फिल्ममेकर शेखर कपूर, आराधना प्रधान यांच्या पुरस्काराची घोषणा केली आहे. 10 जणांच्या पॅनलने या सिनेमांच्या निवड केली आहे. या पुरस्कारात अनेक प्रादेशिक भाषांच्या सिनेमाचा समावेश आहे.

नागराज मंजुळेला पुरस्कार
‘पावसाचा निबंध’ला ऑडिओग्राफीचा पुरस्कार मिळाला असून काही दिवसांपूर्वीच याचा टीझर रिलीज झाला होता. तसेच नागराज मंजुळेला बेस्ट डिरेक्शनचा देखील पुरस्कार मिळाला होता.

महाराष्ट्राची भरीव कामगिरी :
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – कच्चा लिंबू
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – न्यूटन (निर्माता – अमित मसुरकर)
स्पेशल मेन्शन (विशेष दखल) (फीचर फिल्म) – म्होरक्या – यशराज कऱ्हाडे
सर्वोत्कृष्ट संकलन – मृत्युभोग
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (शॉर्ट फिल्म) – पावसाचा निबंध – नागराज मंजुळे
सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म (नॉन फीचर) – मयत – सुयश शिंदे
सर्वोत्कृष्ट प्रमोशनल चित्रपट – चंदेरीनामा- राजेंद्र जंगले

बॉलिवूडमधील पुरस्कार :
सर्वोत्कृष्ट साहसी दृश्यं – अब्बास अली मोगल – (बाहुबली 2)
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स- बाहुबली 2
सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन – गणेश आचार्य (गोरी तू लाथ मार – टॉयलेट एक प्रेम कथा)
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – न्यूटन
स्पेशल मेन्शन (विशेष दखल) (फीचर फिल्म) – अभिनेता पंकज त्रिपाठी (न्यूटन- हिंदी)

इतर पुरस्कार :
सर्वोत्कृष्ट गाणं – ए.आर. रहमान – मॉम (तमिळ)
सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर- ए.आर. रहमान- मॉम (तमिळ)
स्पेशल मेन्शन (विशेष दखल) (फीचर फिल्म) – हेल्लो अर्सी (उडिया)- प्रकृती मिश्रा
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचं पदार्पण – वॉटर बेबी – पिया शाह
सर्वोत्कृष्ट मानववंशशास्त्रावरील चित्रपट- नेम, प्लेस, अॅनिमल, थिंग
सर्वोत्कृष्ट कला आणि संस्कृती – गिरीजादेवी डॉक्युमेंट्री

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर होते. दहा दिग्गजांचाही या समितीत समावेश आहे. 3 मे 2018 रोजी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

*