65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

0
नवी दिल्ली : बॉलिवूड मधील एक नावाजलेले व प्रेक्षकांचे चाहते दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना नुकताच भारतीय चित्रपटसृष्टी मधील मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार मरणोपरांत जाहीर करण्यात आला आहे.
65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज झाली. त्यावेळी विनोद खन्ना यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तसेच दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना मॉम चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला.

शुक्रवारी 65 व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यावेळी फिल्ममेकर शेखर कपूर, आराधना प्रधान यांच्या पुरस्काराची घोषणा केली आहे. 10 जणांच्या पॅनलने या सिनेमांच्या निवड केली आहे. या पुरस्कारात अनेक प्रादेशिक भाषांच्या सिनेमाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

*