650 मेडिकलचे शटर डाऊन

0
रूग्णांचे हाल
 पाच मेडिकलमधून औषध पुरवठा

अहमदनगर (प्रतिनिधी) – केंद्र शासनाच्या निर्णयाविरोधात देशभरातील औषधे विक्रेत्यांनी मंगळवारी बंद पुकारला आहे. या बंदमध्ये नगर शहरातील 650 विक्रेत्यांनी सहभाग घेतल्याने मेडिकल दुकानांचे शटर डाऊन होते.
आखिल भारतीय औषधी विक्रेत्यांच्या संघटनेने संपूर्ण भारतात व राज्यात बेकायदेशीर रित्या चालविल्या जाणार्‍या ऑनलाईन फार्मसी व केंद्र सरकारच्या स्वास्थ व कुटूंब कल्याण, मंत्रालयाव्दारे प्रसिध्द करण्यात आलेल्या पब्लिक नोटीसच्या विरोधात आज देशातील 55 हजार केमिस्ट संपावर गेले आहे. या संपाला पाठिंबा देण्यासाठी नगरशहरातील सुमारे 650 पेक्षा अधिक दुकानदार या परिपत्रकांचा निषेध नोंदवित संपात सहभागी होत केमिस्ट दुकान बंद ठेवली आहे. शहरातील चितळे रोड, सर्जेपुरा, जुना मंगळवार बाजर, दिल्लीगेट माळीवाडा, केडगाव, तारकपुर तसेच उपनगरात मोठ्या प्रमाणात औषध व्रिक्रेत्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी या ऑनलाईन औषध विक्रीचा निषेध नोंदवित आपली दुकाने बंद ठेवली आहे. त्यामुळे शहरातील अनेक रूग्णांचे मोठे हाल सुरु आहे.
देशात ई-फार्मसी व ई-पोर्टल लागू करण्याची योजना सरकार राबवत असल्याचे संपूर्ण देशातील औषध विक्रेते एक दिवसीय लक्षणीय संप पुकराला आहे.

पाच ठिकाणीच औषधं
दरम्यान रुग्णांचे हाल होऊ नये यासाठी सरकारी यंत्रणेला पाच ठिकाणी मेडिकल सुरू ठेवण्यात यश आले. आनंदऋषीजी हॉस्पिटल, सिटी केअर, स्वास्थ हॉस्पिटल, नोबल हॉस्पिटल, डॉ करपे हॉस्पिटल येथील औषध दुकानात रुग्णांसाठी औषधे दिली जात होती.

शहरातील औषध विक्रेत्यांनी दुकाने बंद निषेध नोंदविला आहे. हा बंद ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात आहे. शहरातील रूग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून पाच मेडिकल सुरु ठेवली आहे. जर कोणात्याही रूग्णास तातडीची औषध लागत असल्यास त्यांनी केमिस्ट भवन येथेे संपर्क साधावा. औषधे उपलब्ध करून दिली जातील.
– राजेंद्र बलदोटा, सचिव, अहमदनगर जिल्हा केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट असोसिएशन

 

LEAVE A REPLY

*