Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

अज्ञात इसमाने एटीएम कार्ड बदलत ६५ हजार रुपये लांबवले

Share
इगतपुरी ।प्रतिनिधी
इगतपुरी येथील स्टेट बँकेच्या एटीएम मधुन पैसे काढण्यासाठी गेलेल्या मुलाला मशीन खराब आहे असे सांगुन अज्ञात चोरटयाने एटीएमची अदलाबदल करुन एटीएम व अकाऊंटवरुन 65 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत सत्येन्द्र होतीलाल राम, वय 40 वर्ष, राहणार सहा बंगला, रेल्वे क्वार्टर यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असुन अज्ञात व्यक्तिच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहीती नुसार रेल्वे विभागात स्टेशन मास्तर असलेले सत्येन्द्र होतीलाल राम यांनी पैसे काढण्यासाठी त्यांचा मुलगा अभिनव कुमार यास भारतीय स्टेट बैंकच्या एटीएम मध्ये पाठवले होते.
अभिनव एटीएम मध्ये गेला असता तेथे एक अज्ञात इसम ऊभा होता त्याने एटीएम खराब आहे असे सांगुन त्यास तीन चार वेळेस एटीएम कार्ड मशीन मधे टाकण्यास सांगुन पासवर्ड पाहुन घेतला.
नंतर त्यास पाच हजार रुपये काढल्यावर पैसे नीट मोजुन घे असे सांगत एटीएम कार्डची अदलाबदल केली. अभिनव निघुन गेल्यानंतर एटीएम तसेच खात्यावरून तब्बल 65 हजार रुपये काढून घेतल्याची घटना घडली. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!