पीककर्जमाफीसाठी 64 हजार शेतकर्‍यांचे अर्ज दाखल; 1 लाख 41 हजार फॉर्म वितरित

0
नाशिक । छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील 63 हजार 599 शेतकर्‍यांनी अर्ज जमा केले आहेत. बँक शाखांमधून, सहाय्यक निबंधक कार्यालय आणि तहसीलदार कार्यालयातून 1 लाख 41 हजार शेतकर्‍यांनी पीककर्जमाफीसाठी अर्ज केले आहेत.

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी महा-इ-सेवेचे 450 केंद्रे, आपले सरकार वेब पोर्टलचे 950 केंद्रे आणि इ-संग्राम 50 केंद्रे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र असे असले तरी शेतकर्‍यांना पीककर्ज अर्ज भरून देण्यात अडचणी येत असल्याचे चित्र आहे.

1 लाख 41 हजार शेतकर्‍यांपैकी फक्त 63 हजार शेतकर्‍यांचे अर्ज ऑनलाईन अपलोड झाले आहेत. त्यामुळे अद्यापही निम्म्यापेक्षा अधिक शेतकर्‍यांना हे अर्ज भरण्यास अवधी लागणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना पीककर्जमाफी पदरात पाडून घेण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे, असे चित्र आहे.

जिल्हा उपनिबंधकांकडे ऑनलाईन अपलोड झालेल्या फॉर्मची संख्या 63 हजार 599 एवढी नोंदवली गेली आहे. तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची पूर्तता आणि सातबारावर सदस्यांची नावे याची माहिती घेताना येणार्‍या अडचणी अर्ज भरताना येत आहेत.

त्यामुळे अर्ज भरण्याची कासवगती आहे, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. शेतकरी अर्ज भरत असले तरी वारंवार निकष बदलत असल्याने त्याची पूर्तता करून कागदपत्रांचा सोपस्कार, पुन्हा माहिती अपलोड करण्याची लगबग इ-सेवा केंद्रांवर दिसत आहे.

LEAVE A REPLY

*