Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मालेगावात आतापर्यंत करोनाचे ६०२ रुग्ण; जिल्ह्यातील आकडा पोहोचला ७५९ वर; तर ४५९ झाले करोनामुक्त

Share

नाशिक | प्रतिनिधी

आज नाशिक जिल्ह्यात दिवसभरात १६ रुग्ण बाधीत आढळून आले. त्यामुळे आता करोना विषाणूच्या संसर्गामुळे बाधितांची संख्या ७५९ झाली आहे. एकट्या मालेगाव शहरात आज रात्री आठ वाजेपर्यंत आढळून आलेल्या अहवालानुसार रुग्णसंख्या ६०२ वर पोहोचली आहे. आज आलेल्या अहवालात मालेगावातील आठ रुग्णांची भर पडली. तर आज जिल्हातील १६८ रुग्ण पुर्ण बरे झाले असून आतापर्यंत एकुण ४५९ जणांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांची संख्या वाढते आहे. करोना संसर्गाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावातील परिस्थिती दिवसेंदिवस गँभीर होऊ लागली आहे. बुधवारी रात्री पासून गुरुवारी वारी दिवसभरात एकूण ९४ अहवाल प्रशासनास प्राप्त झाले आहेत. यात एकुण ७३ अहवाल निगेटिव्ह तर १६ जणांचे अहवाल पोजिटिव्ह आले. यामध्ये २ पोलिसांचा समावेश आहे. याशिवाय अन्य रुग्णांची संख्या १३ आहे.

आज जिल्हातील १६८ रुग्ण पुर्ण बरे झाल्याने त्यांची रुग्णालयातून मुक्तता करण्यात आली. यामुळे बरे हाोणरांची संख्या ४५९ झाली असुन प्रशासनास मोठा दिलासा मिळाला आहे. यामध्ये एकट्या मालेगाव शहरात ५९३ रुग्ण असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ९४ रुग्ण आहेत. नाशिक शहरातही रुग्ण संख्या ४२ पर्यंत पोहोचली आहे.

आज मालेगाव वगळता नाशिक शहरातील २, निफाड तालुक्यातील अोझर येथे १, सावरगाव येथे १ पाँझिटिव्ह रुग्ण आढळला करोना विषाणूने आता दिंडोरी, कळवण पाठोपाठ चांदवड तालुक्यामध्ये देखील शिरकाव केला आहे. तालुकावासियांचे धाबे दणाणले आहे. जिल्ह्यात बाधित रुग्ण आढळून आलेल्या तालुक्यांची संख्या आहे ११ पर्यंत पोहोचली आहे.


एकुण रुग्ण – ७५९
नाशिक – ४२
मालेगाव – ६०२
ग्रामिण – ९४
मृत्यु – ३३
करोना मुक्त – ४५९


नाशकात २ रुग्ण

शहरातील नवश्या गणपती परिसरातील गरोदर महिला आणि नवीन नाशिकच्या पंडीतनगर भागातील एका ३५ वर्षीय टॅक्सी चालकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. नाशिक महापालिकेने हे दोन्ही परिसर सील केले.  पंडितनगर येथील शनी मंदिर परिसरातील व्यक्तीला सर्दी खोकल्याचा त्रास झाल्याने ११ तारखेलाउपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच गंगापूर रोडवरील नवश्या गणपती परिसरातील ३२ वर्षीय महिला गरोदर असल्याने तीला वैद्यकीय उपचारासाठी शनिवारी (दि.९) जवळच्याच एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

या महिलेची प्रसुती सिझर करण्यात आली. त्यावेळी तीच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. गुरूवारी तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. दरम्यान, नाशिक मनपा विभागाने हे दोन्ही रूग्ण राहत असलेले परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले. संबंधित महिलेची प्रसुती झालेले रूग्णालय हे संस्थात्मक अलगिकरण म्हणून घोषित केले आहे.

तसेच त्या महिलेच्या संपर्कात आलेले डॉक्टर, नर्स, रुग्णालय कर्मचारी व रुग्णालयात उपस्थित असलेले इतर नातेवाईकांचे त्याच रूग्णालयात अलगीकरण करण्यात आले. दरम्यान, नाशिक शहरातील कोराेनाबाधितांची संख्या ४२ वर पोहचली असून शहरात २४ कन्टेनमेन्ट झोन घोषित करण्यात आले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!