Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकसाहेब, उपचाराअभावी मालेगावात ६०० मृत्यू झाले आहेत – माजी आमदार शेख यांचा...

साहेब, उपचाराअभावी मालेगावात ६०० मृत्यू झाले आहेत – माजी आमदार शेख यांचा आरोग्य मंत्र्यांना फोन

मालेगाव | प्रतिनिधी

सामान्य रुग्णालयसह शहरातील बहुतांश खाजगी रुग्णालय बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे वेळेवर उपचार मिळू न शकल्याने मधुमेह दमा उच्च रक्तदाब व हृदय विकार आधी आजारांनी त्रस्त सहाशे रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. करोना तपासणी करून असे सांगून खाजगी रुग्णालयात उपचार करण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे दोघा गर्भवती महिलांचा मृत्यू झाला. उपचार मिळत नसल्याने विविध आजारांनी बाधित रुग्ण अक्षरशः हताश झाले आहेत. याची प्रशासनाने गंभीर दखल घेत सामान्य रुग्णालय सक्षमतेने सुरू करावे व बंद खाजगी रुग्णालय सुरू करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी काँग्रेसचे माजी आ. आसिफ शेख यांनी केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, आज आरोग्य मंत्री राजेश टोपे हे नाशिक दौऱ्यावर आल्यानंतर आज त्यांनी मालेगाववर विशेष लक्ष देण्याचे सांगितले. यासाठी आजच्या आज मालेगावमधील खाजगी दवाखाने सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. कोविड १९ व्यतिरीक्त रुग्णांचे उपचार झाले पाहिजेत या दृष्टीकोनातून मालेगावात नियोजन केले जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यासोबत बसून याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे टोपे म्हणाले.

काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना माजी आ. आसिफ शेख यांनी आज दूरध्वनी करत वैद्यकीय उपचार मिळत नसल्याने शहरात गत महिनाभरात दमा मधुमेह उच्च रक्तदाब हृदयविकार आदी आजाराने त्रस्त सहाशे नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले असल्याचे सांगितले. यानंतर मालेगावसह नाशिक दौऱ्यावर टोपे आले असून मालेगावबाबत विशेष नियोजन केले जाणार आहे.

सामान्य रुग्णालयात करोणा बाधितांवर उच्चार केले जात होते. तर विषाणूच्या भीतीमुळे शहरातील पन्नास टक्क्यापेक्षा अधिक खाजगी रुग्णालय बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वरील गंभीर आजारांनी त्रस्त नागरिकांना उपचार न मिळाल्याने त्यांचे मृत्यू झाले कबरस्तान मध्ये झालेल्या दफन विधी च्या आकडेवारीवरून आपण ही वस्तुस्थिती मांडत असल्याचे आसिफ शेख यांनी आरोग्य मंत्री टोपे यांना सांगितले.

खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दिलेल्या रुग्णांना करुणा तपासणी करून या असे सांगून परत पाठवले जात आहे. नाशिक व धुळे येथील रुग्णालयांमध्ये देखील असाच अनुभव रुग्णांच्या नातेवाईकांना आला आहे. सामान्य व मनपा तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये जर उपचार मिळू शकत नसतील तर रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती आसिफ शेख यांनी व्यक्त केली आहे.

सामान्य रुग्णालय कोविड मुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे याठिकाणी तज्ञ डॉक्टर व सेवकांची तात्काळ नियुक्ती करावी तसेच मनपा रुग्णालयांमध्ये देखील अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी व सेवक नियुक्त व्हावे यासाठी त्वरित निर्णय घ्यावा मनपाने नोटिसा बजावून देखील खाजगी रुग्णालय सुरू केले जात नाही. त्यामुळे बंद असलेल्या रुग्णालयांचे तात्काळ परवाने रद्द करण्यात यावे अशी मागणी आसिफ शेख यांनी आरोग्य मंत्र्यांकडे केली.

संबंधितांवर गुन्हे दाखल करा

लॉकडाऊन व संचारबंदीमुळे करोना व्यतिरिक्त इतर आजाराच्या रुग्णांसाठी उपचाराचे नियोजन प्रशासन यंत्रणेने करणे गरजेचे होते. मात्र, याबाबत गंभीरता दाखविण्यात आली नाही व नियोजन देखील झाले नाही. त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असल्याने यास जबाबदार दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार आसिफ शेख यांनी शेवटी बोलताना केली.

विस्कळीत यंत्रणा, नागरिक त्रस्त

सामान्य सह इतर मनपा रुग्णालयात करोणा बाधित रुग्णांवर उपचार होत असताना इतर खासगी रुग्णालय सुरू राहणे बंधनकारक होते. मात्र, प्रशासन यंत्रणा फक्त मीटिंग घेऊन या पलीकडे काहीच हालचाल करत नसल्याने रुग्णांचे हाल झाले वैद्यकीय सुविधा पुरविण्यात स्थानिक प्रशासन गंभीर नसून कोणतेच नियोजन नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी माजी आ आसिफ शेख यांनी आरोग्यमंत्री टोपे यांच्याकडे केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या