Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

विंचूरला ५९ टक्के मतदान

Share

विंचूर | वार्ताहर

विधानसभेच्या येवला लासलगाव मतदार संघातील विंचुर येथे मतदान शांततेत पार पडले असून,५९ टक्के मतदान झाले. सकाळी मतदान केंद्रांवर शुकशुकाट जाणवत होता. दुपारी चार वाजे पर्यंत ३५ टक्के मतदान झाले होते. मात्र दुपारी चार वाजे नंतर मतदान केंद्रांसमोर रांगा लागल्या होत्या.महिला मतदारांसमवेत आलेल्या लहान बालकांसाठी पाळणा घराची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. तर मतदार यादीत नावे सापडत नसल्याने मतदारांचा गोंधळ उडत होता.

विंचूर येथे एकुण ९५०३ मतदारांपैकी ५६०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने ५९ टक्के मतदान झाले. हनुमाननगर येथे ११८८ पैकी ८७९ मतदान होऊन ७३.९८ टक्के मतदान झाले.

विष्णुनगर येथे ६८८ पैकी ४७५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने ६९.०४ टक्के मतदान झाले.विठ्ठलवाडी येथे ५५१ पैकी २२३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने ४०.४७ टक्के मतदान झाले.

यावेळी येथील जिल्हा परिषद शाळेसमोर तसेच कर्मवीर विद्यालयात मतदान केंद्रांसमोर दुपारनंतर मोठी गर्दि बघावयास मिळाली. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस कर्मचा-यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!