Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : वयवर्ष ५८; वर्तमानपत्रापासून ‘त्या’ बनवतात शोभेच्या वस्तू, फुलदाणी आणि बाहुल्या

Share

 

नाशिक | प्रतिनिधी

वृत्तपत्रांचे आयुष्य एका दिवसापेक्षा क्वचितच जास्त असते. बातम्या डिजिटल झाल्या असल्या तरी वृत्तपत्र पूर्णतः बंद झालेले नाही. घरातल्या प्रत्येकालाच चहाच्या वेळी वर्तमानपत्र हातात घेतल्याशिवाय चहा घोटला जात नाही. यामुळे वर्तमानपत्रांची रद्दीही प्रत्येक घरात दिसून येते.

ग्रामीण भागात आजही वर्तमानपत्राच्या रद्दीपासून वेगवेगळ्या संसारोपयोगी साहित्य बनवले जाते.  मात्र, नाशिकच्या ५८ वर्षीय ज्येष्ठ महिलेने रद्दीपासून शोभेच्या वस्तू, फुलदाणी, बाहुल्या बनविण्याचा छंद जोपासला आहे. दररोज कालबाह्य होणाऱ्या वर्तमानपत्रापासून निघणाऱ्या रद्दीपासून असे काही बनवता येऊ शकते याचा अनोखा पायंडाच जणू या महिलेने घालून दिला आहे.

मीना पाटणकर असे या महिलेचे नाव आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन पोहोचले आहेत. पाटणकर यांनी स्मार्टफोनचा प्रभावी वापर करत युट्यूबच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या रद्दीपासून बाहुल्या तयार करण्याचे शिकून घेतले.

काही दिवसांनी या बाहुल्यांना चांगलाच भाव आला. पाटणकर यांनी नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शनही भरवले होते. प्रदर्शनास अनेक नाशिककरांनी भेटी देत, त्यांच्या या अनोख्या छंदाचे तोंड भरून कौतुक केले तर अनेकांनी त्यांच्याकडून बाहुल्या बनविण्याचे तंत्र  शिकूनही घेतल्याचे त्यांनी सांगितले.

एरव्ही भंगारवाल्यास दिल्या जाणारया रद्दीला नवी झळाळी देण्याचे कामी हाती घेतले आहे. पाटणकर गृहिणी असून कामातून वेळ मिळाला की, त्या कागदापासून विविध वस्तू बनवत असतात. साधारण २०१४ ला फेसबुकच्या माध्यमातून ही कल्पना सुचल्याचे त्या सांगतात.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!