Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिकमधून आतापर्यंत ५३४ रुग्ण करोनामुक्त; मालेगावचे सर्वाधिक ४२८ रुग्ण बरे

Share

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यातील ७७८ पाॅझिटिव्ह रुग्णांपैकी तब्बल ५३४ रुग्ण करोनामुक्त झाले असून त्यात सर्वाधिक संख्या हि करोनाचे हाॅटस्पाॅट असलेल्या मालेगावमधील आहे. या ठिकाणी ४२८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. नागरिकांचा प्रतिसाद, सर्व यंत्रणांचा समन्वय आणि नियोजनबध्द उपचार पध्दती या त्रिसूत्रीने करोनावर मात केल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील नागरिकांसह पोलिस, प्रशासकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांना देखील करोनाची लागण झाली होती. मालेगाव शहरात रुग्णांची संख्या चिंताजनक रित्या वाढत होती. गेल्या दीड महिन्यात करोनाग्रस्तांची संख्या ७७८ वर पोहचली होती. मात्र आतापर्यंत ५३४ रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात यश आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे ५३४ मध्ये मालेगांव शहरातील ४२८ रुग्णांचा समावेश आहे.

तसेच डिस्चार्ज दिल्यानंतर पुन्हा आजाराची लक्षणे जाणवून पुन्हा दवाखान्यात परत आलेले एकही प्रकरण दिसून आलेले नाही. यावरून रुग्णांना योग्य उपचार मिळून ते कोरोना संसर्गातून बाहेर पडलेले आहेत हे स्पष्ट होते.

करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात अतिशय समाधानकारक दिसून येत आहे. आरोग्य विभागातील डॉक्टर्स, कर्मचारी तसेच इतर सर्वच यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहेत.

येत्या काही दिवसात रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण आणखी वाढणार आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात २५, नाशिक महानगर पालिकेच्या रुग्णालयात ०३, डॉ. वसंतराव पवार मेडीकल कॉलेजमधे ७७, मालेगाव येथे ६६ तर नाशिक ग्रामीण मध्ये ३७ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. दुर्दैवाने आत्तापर्यंत जिल्ह्यात ३३ रुग्ण या संसर्गजन्य आजाराने दगावले.


करोना पाॅझिटिव्ह आलेख खालावला

आरोग्य यंत्रणेसाठी सुखावह बाब म्हणजे मागील ८ एप्रिलपासून कोरोना रुग्ण वाढीच्या आलेखामुळे राज्यभरात चिंतेचा विषय ठरलेल्या मालेगावात आता परिस्थितीत बदलत आहे. एकीकडे दररोज येणाऱ्या पॉझिटीव्ह अहवालामध्ये कमालीची घट झाली असून, दुसरीकडे रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही दिलासादायक आहे. कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबतच्या नवीन नियमानुसार मालेगावातील तब्बल ६०२ रुग्णांपैकी मालेगांव ४२८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसेंदिवस रुग्ण उपचाराना साथ देत असून बरे होण्याचे प्रमाणात वाढ दिसून येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!