Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

120 टक्के पावसानंतरही 530 पाणी योजना कोरड्या

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – परतीचा पाऊस अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनूसार जिल्ह्यात शुक्रवारअखेर सरासरीच्या तुलनेत 119.96 टक्के पाऊस झालेला आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभागाच्या आकडेवारीनूसार जिल्ह्यातील 1 हजार 446 पाणी योजनांपैकी 918 पाणी योजनाच्या उद्भवात पाणीसाठा आहे. तर 530 योजनांचे उद्भव कोरडे असून 487 पाणी योजनांमध्ये कमी पाणीसाठा आहे. यामुळे यंदा देखील जिल्ह्याच्या अनेक भागात उन्हाळ्यात पाणी टंचाईला समोरे जाण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 14 तालुक्यापैकी आठ तालुक्यात 100 टक्क्यांच्या पुढे पर्जन्यमान आहे. यात अकोले तालुक्यात सरासरीच्या तुलनेत 266 टक्के पाऊस झालेला असून त्यानंतर संगमनेर तालुक्यात 148 टक्के, श्रीरामपूर 143 टक्के, नेवासा 129 टक्के, कोपरगाव 126 टक्के, पारनेर 114 टक्के, नगर 111 टक्के, राहाता 109 टक्के, श्रीगोंदा 102 टक्के पावसाची नोंद आहे. तर राहुरी तालुक्यात 98 टक्के, शेवगाव तालुक्यात 96 टक्के, पाथर्डी 92 टक्के, जामखेड तालुक्यात 82 आणि कर्जत तालुक्यात 80 टक्के पावसाची नोंद आहे. असे असतांना जिल्हा परिषदेकडे असणार्‍या स्वतंत्र 1 हजार 446 नळ पाणी पुरवठा योजनांपैकी 530 योजनांचे उद्भव कोरडे आहेत.

यासह 487 पाणी योजनांमध्ये पुरेसा पाणीसाठा नाही. यामुळे यंदा देखील उन्हाळ्या पाणी टंचाई संकटाची टांगती तलवार राहणार आहे. यासह या पाणी योजनांपैकी 9 योजनांची पाईप लाईन नादूरूस्त असून यात कर्जत तालुक्यातील योजनांचा समावेश आहे. 1 योजनेची वीजचे थकबाकी आहे, यात श्रीरामपूर तालुक्यातील योजनेचा समावेश आहे. 6 पाणी योजनांचे उद्भव दूषित यात नगरमधील 5 तर श्रीरामपूरमधील एका योजनेचा असून 27 पाणी योजना कायम स्वरूपी बंद झाल्या आहेत. यात अकोले 2, पारनेर 8, कर्जत 7 आणि जामखेडच्या 10 योजनांचा समावेश आहे.

पाण्याअभावी बंद योजना
अकोले 2, संगमनेर 10, राहाता 3, राहुरी 5, नेवासा 33, शेवगाव 7, पाथर्डी 61, नगर 52, पारनेर 85, श्रीगोंदा 75, कर्जत 93, जामखेड 102 यांचा समावेश आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!