Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

बापरे! मुलाच्या तोंडातून काढले 526 दात; पाच तासांंची यशस्वी शस्त्रक्रिया

Share

चेन्नई। वृत्तसंस्था

येथील एका सात वर्षाच्या मुलाच्या तोंडातून 32 नव्हे तर तब्बल 526 दात काढण्यात आले आहेत. सात वर्षीय मुलाच्या तोंडात 526 दात निघाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून यशस्वी शस्त्रक्रिया केल्याबद्दल डॉक्टरांचेही कौतुक होत आहे.

रवींद्रनाथ असें या मुलाचे नाव आहे. त्याचे तोंड सुजल्याने दात किडला असेल म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी त्याला डॉक्टरकडे दाखवले. त्यावेळी त्याच्या हाडाच्या जबड्याला अनेक दात जोडलेले असल्याचें डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्याचे 21 दात वगळता सर्व 526 दात बाहेर काढले. हे सवे दात लहान,मध्यम,मोठ्या आकाराचे असून त्याचे वजन सुमारे 200 ग्रॅम इतके आहे.चेन्नईच्या सविता डेंटल कॉलेजमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

ही शस्त्रक्रिया करण्यासाठी मुलाच्या पालकांनी संमती दर्शवली.मात्र रवींद्रनाथला समजावण्यात डॉक्टरांना बराच वेळ घालवावा लागला. त्याची संमती मिळताच शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. तब्बल पाच तास ही शस्त्रक्रिया चाललीं. डॉक्टरांनी त्याच्या तोंडातून 526 दात काढले असले तरी दात नेमके कशामुळे आले? याचे कोडं मात्र डॉक्टरांना अद्याप सुटलेलें नाही.

रवींद्रनाथ तीन वर्षाचा असतानाच त्याच्या गळ्याला सूज आली होती. सरकारी रुग्णालयात नेल्यानंतर त्याची तपासणी करावीं लागेल असें डॉक्टरांनी सांगितले होते.

मात्र त्याला रविंद्रनाथने नकार दिला होता. मात्र वाढत्या वयाबरोबर त्याची दातदुखी वाढत गेल्याने अखेर त्याला सविता डेंटल कॉलेजात आणून विविध टेस्ट करण्यात आल्या. त्याचा एक्स रे आणि सीटीस्कॅनही करण्यात आला. त्यांनंतर 11 जुलै रोजी सर्जरी करून त्याचे दात काढण्यात आल्याचें रविंद्रनाथच्या वडिलांनी सांगितलें. दरम्यान, यापूर्वी 2014मध्ये मुंबईतील एका मुलाच्या तोंडातून 232 दात काढण्यात आले होते.

मोबाईल टॉवरच्या रेडिएशनमुळे आणि अनुवांशिक कारणामुळेही हे होऊ शकते.मात्र रवींद्रनाथनची शस्त्रक्रिया करणें गरजेचें होते.

– डॉ.सेंथिलनाथन,ेंसविता डेंटल कॉलेज

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!