Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिक : सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्याला ५२ लाखांना गंडा

नाशिक : सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्याला ५२ लाखांना गंडा

इंदिरानगर | वार्ताहर

मोठा दवाखाना व मुलीचे वस्तीग्रह शाळा तसेच मंदिर बांधायचे आहे त्यासाठी दोन कोटी रुपयांची गरज असून माझ्याकडे सोने आहे यज्ञ केल्याशिवाय सोने विकता येणार नाही. म्हणून एक महिन्यासाठी 52 लाख रुपये देण्याची विनंती करुण सोने विकून पैसे परत करतो अशी खोटी बतावणी करून सेवानिवृत्त शासकीय अधिकारयाची 52 लाखाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगन्नाथ खंडेराव जाधव (वय 77 रा उच्च न्यायालय जवळ सिडको औरंगाबाद) हे सेवानिवृत्त शासकीय अधिकारी असून संशयित आरोपी गणेश जयराम जगताप ऊर्फ बाबाजी वय 38 रा. बडे बाबा मंदिर सब स्टेशन वडाळा पाथर्डी रोड )वसंत जगन्नाथ पाटील वय (50 ) बाबाजी यांची बडे बाबा मच्छिंद्रनाथ ट्रस्ट नावाची संस्था आहे.

तर जाधव यांच्या विविध ठिकाणी 40 शाळा आणि 20 महाविद्यालये आहेत. त्यांचेे परिचित कमलाकर दुबे यांच्या मार्फत गत वर्षी मे महिन्यात बाबाजींची सोबत भेट झाली.

त्यावेळी त्यांनी आपल्याला मुलींसाठी शाळा, वसतिगृह ,रुग्णालय ,मंदिर आदि बांधायचे आहे असे सांगितले. त्यासाठी जवळ असलेले सोने विकणार आहे.

मात्र त्यापूर्वी एक मोठा यज्ञ करायचा असून त्यासाठी दोन कोटी रुपयांची गरज आहे .मात्र या यज्ञासाठी जवळ असलेले सोने विकू शकत नाही .त्यामुळे त्यांनी जाधव यांच्याकडे एका महिन्यासाठी पैसे देण्याची विनंती केली.

त्याच अनुषंगाने जाधव यांच्या संस्थेच्या मुंबई येथील कार्यालयात 28 मे रोजी बाबाजी यांच्यासोबत निलेश घुगे ,राजू भैय्या ठोंबरे आणि चालक शेखर आले त्या दिवशी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून जाधव यांनी संस्थेच्या मुंबई येथील जीएस महानगर बँकेच्या खात्यातून बाबाजींच्या नाशिक येथील गंगापूर रोड वरील ॲक्सिस बँकेच्या खात्यात वीस लाख रुपये वळते केले.

त्यानंतर दोनच दिवसांनी बाबाजी 30 मे ला जाधव यांच्या औरंगाबाद येथील घरी गेले.त्यांच्यासोबत वसंत जगन्नाथ पाटील हे देखील होते. पाटील हे नाशिकच्या कामटवाडे येथील अमृतधारा नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. याच पतसंस्थेत माझ्या पाच कोटीच्या ठेवी देखील आहेत असे त्यांनी सांगितले.

त्याची मूळ कागदपत्रे देखील त्यांनी दाखवली आणि पुन्हा पैसे देण्याची मागणी केली. त्यावर जाधव यांनी पाटील यांच्याकडून हमीपत्र देखील लिहून घेतले.

त्यात दिलेले पैसे व्याजासह परत केले जातील असे नमूद करून घेतले .या सर्व बाबींवर विश्वास ठेवून जाधव यांनी ते अध्यक्ष असलेल्या लोकविकास बँकेचे प्रत्येकी दहा लाखाचे तीन धनादेश बाबाजींना दिले.

त्यानंतर देखील 12 जूनला पुन्हा दोन लाख रुपये थेट बँक खात्यात वर्ग केले. महिना उलटल्यानंतर जाधव यांनी पैशांची मागणी केली असतात दोन ते तीन महिन्यात परत देतो असे आश्वासन दिले .दरम्यान जाधव यांनी पाटील यांना देखील याबाबत सांगितले आणि पैशांची मागणी केली.

त्यांनीदेखील तुमचे पैसे परत मिळतील असेच सांगितले .मात्र तगादा लावून देखील सतत टाळाटाळ केली जाऊ लागली .त्यामुळे अखेर जाधव यांनी बाबाजी आणि पाटील या दोघांनी 52 लाखांची फसवणूक केल्याची फिर्याद इंदिरानगर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

दरम्यान, कथित बाबाजीने महेश पठाडे रा. पिंपळस, रामदास जाधव निफाड ,संजय शिंदे आणि पल्लवी बेलेकर नाशिक यांना रेल्वेत नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घातल्याचे देखील फिर्यादीत नमूद केले आहे.

याप्रकरणी जगन्नाथ जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, इंदिरानगर पोलीस ठाण्यात भा. द. वी कलम 420 ,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास व पो नि निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पाटील करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या