Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

गंगापूर धरणातून ५ हजार १०० क्युसेकने विसर्ग

Share

नाशिक | प्रतिनिधी 

त्र्यंबकेश्वर आणि गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा रात्रीपासून हजेरी लावल्यामुळे गंगापूर धरणातून कमी करण्यात आलेला पाणीसाठी आज सकाळी १ हजार क्युसेकने वाढविण्यास आला आहे.

त्र्यंबकेश्वर आणि गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असल्यामुळे काल सायंकाळी गंगापूर धरणातून सुरु असलेला  २ हजार क्युसेकचा विसर्ग आणखी दोन हजार क्युसेकने वाढून ३ हजार ९०० क्युसेकपर्यंत नेण्यात आला होता.

दरम्यान, पावसाची संततधार सुरु असल्याने आज सकाळी पुन्हा एक हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणातून वाढविण्यात आला आहे.

अजूनही त्र्यंबकेश्वर, गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची रिपरिप सुरु आहे. यामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठा वाढल्यास पुन्हा गोदावरीत विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.

गोदावरीचा पूर जरी ओसरला असला तरी नदीकाठी अजूनही पाणी वाढण्याची शक्यता असल्यामुळे परिसरातील नागरिकांना अजूनही पुराची भीती आहे. गोदाकाठ हळूहळू पूर्वपदावर येत असून अजूनही अनेक घरांमध्ये चिखल साचलेला दिसून येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!