Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश

Video: चंद्रावर पाऊल ठेवून मानवाला झाली ५० वर्षे !

Share

अमेरिका | वृत्तसंस्था

५० वर्षापूर्वी नासा अपोलो ११ अभियानांतर्गत पहिल्यांदा चंद्रावर नील आर्मस्ट्रांग पोहोचला. गुगलने आज डुडल तयार करून ह्या मिशनला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मानवंदना दिली आहे. अपोलो ११ मिशन सफल करण्यात चार लाख लोकांच्या टीमने कशाप्रकारे हा क्षण यशस्वी करून दाखवला होता हे या व्हिडीओत दाखवले आहे.

यामध्ये बसलेले तीन अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉन्ग, एडविन ‘बज़’ एल्ड्रिन आणि माइकल कॉलिन्स यांना सुरक्षित चंद्रावर घेऊन जाऊन पृथ्वीवर परत घेवून येणे असे या मिशनचा हेतू होता. माइकल कॉलिन्स सहपायलट म्हणून अपोलो ११ मध्ये उपस्थित होते. त्याचवेळी नील आर्मस्ट्रॉन्ग आणि एडविन ‘बज़’ एल्ड्रिनने चंद्रावर पाय ठेवला होता.

उद्या २० जुलैला नील आर्मस्ट्रॉन्ग आणि एडविन ‘बज़’ एल्ड्रिन यांना चंद्रावर पहिले पाऊल ठेवायला ५० वर्ष पूर्ण होणार आहेत. अपोलो ११ ला १९६९ मध्ये कँनेडी स्पेस सेंटर लॉन्च कॉम्प्लेक्स 39 ए पासून सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी लॉन्च केले गेले होते. अपोलो ११ मध्ये मायकल कॉलिन्सबने मॉड्यूल पायलटची जबाबदारी सांभाळली होती. नील आर्मस्ट्रॉन्ग आणि एडविन ‘बज़’ एल्ड्रिन चंद्रावर भ्रमणसाठी निघाले. ज्या लूनर मॉड्यूल मधून हे दोघी अंतराळवीर अपोलो ११ मध्ये बसून चंद्रापर्यंत पोहचले त्याला ‘द ईगल’ नाव देण्यात आले होते. चंद्रावर दोघा अंतराळवीरांनी २१ तास ३२ मिनिट वेळ घालवला होता. एडविन ‘बज़’ एल्ड्रिनने नील आर्मस्ट्रॉन्गच्या १९ मिनिटांनंतर चंद्रावर पाय ठेवला.

दोघांनी स्पेस क्राफ्टवर २ तास १५ मिनिट घालवली. नील आर्मस्ट्रॉन्ग आणि एडविन ‘बज़’ एल्ड्रिन यांच्यासाठी चंद्रावर जाण्याचा हा प्रवास वाटतो तेव्हढा सोप्पा नव्हता. सर्वात आधी दोन्ही अंतराळवीरांचा पृथ्वीचा रेडियो संपर्क तुटला होता. त्यानंतर ऑनबोर्ड कॉम्पुटरमध्ये अनेक एरर कोड्स आले होते. एवढेच नव्हे तर ‘द ईगल’च्या इंधनची कार्यक्षमतादेखील घटलेली दिसून आली होती. परंतु नील आर्मस्ट्रॉन्ग आणि एडविन एल्ड्रिन यांनी दोघांनी मिळून यशस्वीपणे सर्व अडचणींचा सामना करत २० जुलै १९६९ ला चंद्रावर पाऊल ठेवले होते.

अपोलो ११च्या ह्या मिशन सोबतच नील आर्मस्ट्रॉन्ग चंद्रावर पोहचणारे पहिले व्यक्ती बनले. नील आर्मस्ट्रॉन्गच्या काही मिनिटांनंतर एडविन ‘बज़’ एल्ड्रिनने चंद्रावर पाय ठेवला. त्यासह, माइकल कॉलिन्स यांनी ऑरबिट पायलट म्हणून जबाबदारी सांभाळली.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!