घाटनदेवी वनउद्यानात 500 रोपांची लागवड

0

नाशिक । इगतपुरीच्या घाटमाथ्यावर असलेल्या घाटनदेवी मंदिराजवळील वन उद्यानाला हिरवाईचा साज चढविण्यासाठी भारतीय पत्रकार महासंघाच्या वतीने घाटनदेवी वनउद्यान परीसरात 500 रोपांची लागवड केली.

घाटनदेवी वन उद्यान व परीसरात होणारे जलप्रदुषण, वायुप्रदुषण कमी व्हावे, वन उद्यानाचे तट सुरक्षित राहुन जैवविविधता राखली जावी.

तसेच वन उद्यानातील प्रदुषण युक्त विषारी घटकांचे नैसर्गिक शोषण व्हावे यासाठी विविध वन औषधी रोपे, शोभेची रोपे तसेच कडुनिंब, चिंच, जांभुळ, पापडा, भोकर, अर्जुन, उंबर, शिसव, आपटा कांचन, आंबा, शिवन, पुत्रंजिवा आदी जातीचे रोपांची लागवड करण्यात आली.या उपक्रमात महासंघाचे अध्यक्ष नवलसिंग राजपुत, वन परिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे, प्रशांत आहिरे, जिल्हा संघटक आकाश पगारे, उपाध्यक्ष योगेश पवार, तुषार गवळी, एकनाथ बोडके, विशाल पिल्ले, अमोल मोरे, कय्युम पटेल, निलेश टर्ले, किरण गांगुर्डे, अनिल बिडगर, प्रमोद आहेर, किरण सानप, जिमनेश कालेकर, नचिकेत जाधव, राकेश फड यांच्यासह वन विभाग कर्मचारी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

*