Photo Gallery : 50 हजार बंगी जम्प्सची कीर्तीध्वजा..!

0
जम्पीन हाईट्स या देशातील पहिल्या साहसी क्रीडा प्रकार झोन तथा सर्वोच्च बंगी जम्पिंंग प्लॅटफॉर्मने 50 हजार बंगी जम्प्सचा टप्पा पार करून वेगळी यशोकीर्ती गाठली. यशाचा हा टप्पा साजरा करण्यासाठी एका खास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये स्थानिक जम्पर्स, ‘दंगल गर्ल्स’ फातिमा शेख व सानिया मल्होत्रा यासह शेकडो जण सहभागी झाले.

‘दंगल’ चित्रपटात कॉमनवेल्थ स्पर्धात सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटू गीता फोगाटची भूमिका केलेली फातिमा शेख हिने यावेळी याच चित्रपटात भारतीय कुस्तीपटू तथा महावीर सिंग फोगाटच्या मुलीची म्हणजेच बबिता कुमारीची भूमिका साकारलेल्या सानिया मल्होत्राला ‘चिअर-अप्’ केले. कारण तिने 50 हजारावी बंगी जम्प घेऊन महिलांच्या सक्षमीकरणाच्या सारांशाचे अनोखे सादरीकरण केले.

याप्रसंगी जम्पीन हाईट्सचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक, निवृत्त कॅप्टन राहुल निगम म्हणाले, 50 हजार बंगी जम्प्सचा टप्पा पार केल्याचा आम्हला अपार आनंद झाला आहे. या साहसी प्रकारातील आमची पहिली जम्पर एक महिला होती आणि यामध्ये सातत्य राहून 50 हजारावी जम्पदेखील सानिया मल्होत्राच्या रूपात महिलेनेच मारून एक नवा अध्याय गाठला आहे.

हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षणासोबतच वेगळा सन्मान आहे. ते म्हणाले की, आम्ही फातिमा व सानिया या ‘दंगल’ गर्ल्सचे आभारी आहोत की त्यांनी या सोहळ्यात सहभागी होऊन त्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यांनी स्क्रीनवर दमदार भूमिका साकारल्या आहेत, ज्या मनोबल व स्थितीस्थापकता या पैलूंवर भर देतात. ह्याच पैलूंवर जम्पीन हाईट्सचे जणू तत्वज्ञान आधारलेले आहे.

जम्पीन हाईट्स झोनबद्दल : जम्पीन हाईट्स हा देशातील पहिला साहसी क्रीडा झोन ऋषिकेश येथे अत्याकर्षक लॅण्डस्केपवर साकारण्यात आले आहे. जम्पीन हाईट्समार्फत बंगी जम्पींग, फ्लाईंग फॉक्स, जायंट स्विंग या उपक्रमांची उपलब्धता करून देण्यात येते.

सन 2010 मध्ये निवृत्त कॅप्टन राहुल निगम यांनी जम्पीन हाईट्सची मुहूर्तमेढ रोवली. तरुणाई आणि साहसी उत्साही जनांसाठी ते एक सबळ व्यासपीठ ठरले. त्याला आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांची जोड देऊन त्याचे व्यावसायिक तत्वावर रुपांतर करण्याचा निगम यांचा मानस होता.

वैभवशाली गंगेच्या किनारी त्याची उभारणी करण्यात आली आहे. बंगी जम्पसाठी ते सर्वोच्च (83 मीटर) व्यासपीठ ठरले आहे. परिणामी, या प्रकल्पाने देशातील साहसाला संघटनात्मक सुरक्षिततेचा एक वेगळा आयाम मिळाला आहे.

 

 

LEAVE A REPLY

*