जळगाव : जिल्ह्यात नव्याने आढळले ५० करोना बाधित रुग्ण

jalgaon-digital
2 Min Read

एकूण रुग्णसंख्या गेली ९५७ वर

जळगाव – 

जिल्ह्यात शुक्रवारी नव्याने 50 कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 957 झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये जळगाव शहरातील एक, भुसावळ चार, चोपडा तीन, पाचोरा सात, भडगाव एक, धरणगाव एक, यावल सहा, एरंडोल एक, जामनेर तीन, जळगाव ग्रामीण मधील एक, रावेर 17, चाळीसगाव चार तर मुक्ताईनगरातील एक रुग्णांचा समावेश आहे.

शुक्रवारी आढळून आलेल्या पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे एकट्या रावेर शहरातील असल्यामुळे चिंता आणखीन वाढली आहे. जळगाव शहरात मात्र शुक्रवारी एकच रुग्ण आढळून आल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

जळगाव शहरात आतापर्यंत सापडलेल्या रुग्णांची संख्या 206 इतकी झाली आहे. तर भुसावळात आतापर्यंत 209 रुग्ण आढळून आले आहे. चोपडा येथे आतापर्यंत एकूण 49, पाचोरा येथे 35, भडगाव येथे 80, यावल येथे 38, एरंडोल येथे 18, जामनेर येथे 20, जळगाव ग्रामीण 29, रावेर येथे 69, चाळीसगाव येथे 12 तर मुक्ताईनगरात आठ रुग्ण पॉझीटीव्ह आतापर्यंत आढळून आले आहेत.

448 जण कोरोनामुक्त

जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण 448 कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण कोरोना मुक्त झाले असून 392 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी 40 रुग्णांची परिस्थिती अत्यवस्थ आहे. गेल्या 24 तासात एकूण 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील एका 60 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर भुसावळ येथील 70 वर्षीय महिलेचा देखील मृत्यू झाला आहे, धरणगाव तालुक्यातील एका 74 वर्षीय पुरुषाचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

चिंचोलीत महिला कोरोना पॉझीटीव्ह

जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील 55 वर्षीय महिला कोरोना पॉझीटीव्ह असल्याची बाब अहवालावरून समोर आली आहे. सदर महिला ही नवीन कोरोना रुग्ण म्हणून चिंचोली गावात भर पडली आहे. या महिलेला कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या महिलेच्या शेजारील व संपर्कात असलेल्या 8 जणांना अ‍ॅडमीट करण्यात आले आहे. तर 12 जणांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *