Type to search

जळगाव

50 लाखांच्या खंडणीप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

Share

जळगाव । 50 लाख रूपयांची खंडणी मागून न दिल्यास मुलाचे अपहरण करून जीवे ठार मारू, अशा शब्दात सेवानिवृत्त अभियंता रवींद्र मोरे (68) यांना धमकाविल्याप्रकरणी युको बँकेतील कर्मचारी विलास आळंदेसह तिघां विरोधात जिल्हापेठ पोलिसात तर निवृत्त अभियंता रवींद्र मोरे यांचा मुलगा तेजस याने विलास आळंदे यांचा मुलगा स्वप्नील याच्या नावावर घेतलेले 50 लाख रूपयांचे कर्ज मागू नये म्हणून धीरज पाटील यांच्यासह इतरांच्या मदतीने आपल्या विरोधात खोट्या तक्रारी व वृत्तपत्रात खोटे वृत्त प्रसिध्द करून प्रकरण मिटविण्यासाठी 15 लाखांची खंडणीची मागणी केल्याप्रकरणी निवृत्त अभियंता पुत्र तेजस मोरेसह सहा जणांविरोधात शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र मोरे हे त्यांच्या पत्नी जयश्री, मुलगा तेजस यांच्यासह जि.प.कॉलनीत वास्तव्यास आहेत. मुलगा तेजस याला व्यवसायासाठी पैशांची गरज भासत होती. स्वप्नील आळंदे या त्याच्या मित्राच्या माध्यमातून तेजस याने विलास आळंदे यांच्याकडून 50 लाख रूपये घेतले होते. सदरची रक्कम नंतर त्याने परत केली. परंतु तरीदेखील विलास आळंदे यांनी दि. 13 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास रवींद्र मोरे यांच्या जि.प.कॉलनीतील निवासस्थानी येऊन 50 लाख रूपयांची खंडणीची मागणी केली. न दिल्यास मुलाचे अपहरण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच रवींद्र मोरे यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी रवींद्र मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विलास आळंदे, स्वप्नील आळंदे, निखील आळंदे, अनिल आळंदे यांच्या विरोधात गुरनं 173/19 भादंवि कलम 385,323,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर आळंदे हे करीत आहेत.

विलास आळंदे (56) हे संत ज्ञानेश्वर कॉलनी रेल्वेलाईन परिसरात पत्नी अनिता यांच्यासह वास्तव्यास आहेत. ते युको बँकेत कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा मोठा मुलगा स्वप्नील हा पुणे येथे व्यवसाय करतो. मुलगा स्वप्नील याचा रवींद्र तेजस (जळगाव) हा मित्र असून पाच वर्षापूर्वी त्याने स्वप्नील याच्या नावावर कॉर्पेरेशन बँक जळगावकडून 50 लाख रूपये कर्ज घेतले आहे. तसेच त्याला विलास आळंदे यांनी त्यांच्या घराशेजारील भाऊ ज्ञानेश्वर आळंदे यांच्या मालकीचे घर तारण ठेवलेले आहे. सदरचे पैसे वेळोवेळी मागीतले असता मी बँकेत पैसे भरून देईल, असे सांगून सदर बँकेतला 53 लाख रूपयाचा चेक चार महिन्यांपूर्वी दिला. परंतु सदर चेक न वटल्यामुळे बँकेने तेसज मोरे याच्याविरूध्द निगोशीएल क्टप्रमाणे कारवाई केली आहे. 13 ऑगस्ट 19 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास विलास हे घरी असताना त्यांना मोबाईलवरून धमकविण्यात आले. महिलेस त्रास दिल्याने तुला आम्ही सोडणार नाही, अशी धमकी देण्यात आली. या प्रकरणी विलास आळंदे यांनी जिल्हापेठ पोलिसात अदखलपात्र तक्रार दिली होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!