राहत्या घरातून काढला 5 ट्रक्टर कचरा

0

कचरा कुजल्याने परिसरात दुर्गंधी : पालीकेची कारवाई

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)- कोपरगाव शहरातील पांडे गल्ली येथे राहणार्‍या ज्योती रमनलाल राणा, स्वाती रमनलाल राणा या दोघी बहींणीच्या एका घरात गेल्या अनेक वर्षापासून साठलेला तब्बल 5 ट्रक्टर कुजलेला कचरा कोपरगाव पालीकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांनी काढला.
शहरातील पांडे गल्ली येथे दोन बहीणी गेल्या अनेक वर्षापासुन शहरातील विविध ठिकाणी पडलल्या टाकावू वस्तु गोळा करून घरात साठवत होत्या. त्या साठवलेल्या वस्तू कुजल्याने,गोमुत्राच्या वासामुळे या परिसरात दुर्गंधी सुटली. या परिसरात राहणार्‍या नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याने नागरीकांमधुन संतापाची लाट उसळली.
नागरीकांनी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार केल्या नंतर पालिकेचे आरोग्य अधिक्षक पी. एम. चव्हाण यांनी मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण मोहीम राबवुन राणा भगिनींच्या घराची साफसफाई शनिवार दि.25 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 8ः30वाजता सुरू केली या दरत्यान तब्बल 25 सफाई कर्मचार्‍यांनी राणा यांच्या घराची सफाई करून केवळ घरा बाहेरच्या परिसरातुन तब्बल 5 ट्रक्टर कचरा काढण्यात आला.
हा कचरा काढल्या नंतर परिसरात अधिक दुर्गंधी सुटली होती. पालीका कर्मचार्‍यांनी राणा भगिनींच्या घराबाहेरून 5 ट्रक्टर कुजलेला कचरा काढला आहे. त्या कचर्‍यात पैशाच्या बरण्या सापडल्या तर आजुन बंद घरातील कचरा काढणे बाकी आहे. घरामध्ये काय निघेल याची उत्सुकता परिसरातील नागरीकांना लागली आहे.

LEAVE A REPLY

*