१५ निलंबित तर ४ सेंटर्सची मान्यता रद्द; पीयूसी सेंटर धारकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

0
पंचवटी | वार्ताहर
पी .यु .सी सेंटर्स ला दिलेल्या नियमाप्रमाणे काम न केल्यास तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर निलंबनाची किंवा रद्द करण्याची कारवाई केली जाईल अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी दिली .
वाहन  रस्त्यावर चालवतांना वाहनासोबत वाहन सोबत आर .सी .बुक ,  लायसन्स,  इन्शुरन्स, तसेच पी.यू .सी प्रमाणपत्र बाळगणे गरजेचे आहे.
तर पी .यु .सी. प्रमाणपत्र हे शासनाने अधिकृत केलेल्या पी .यू .सी . सेंटर मार्फत वाहनांची तपासणी होऊन पी .यु.सी. प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.
जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी पी .यु .सी .सेंटरला मान्यता देताना व प्रत्यक्ष कामकाज करण्यासाठी विविध प्रकारचे नियम व बंधने आहेत.
या नियमांच्या  आधीन राहूनच पी .यू.सी सेंटर्स धारकांनी कामकाज करणे गरजेचे आहे. मात्र पी .यू.सी सेंटर धारक नियमांचे पालन करत नसतील तर त्यांना देण्यात आलेले अधिकार पत्र निलंबित करण्याचे अधिकार प्रादेशिक परिवहन कार्यालयाला आहेत.
पी.यू.सी सेंटर्स ला घालून दिलेल्या नियमांप्रमाणे त्यांचे कामकाज चालू आहे की नाही याची प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वेळोवेळी तपासणी करण्यात येते. याच पद्धतीने कार्यालयाने जानेवारी २०१८ ते जानेवारी २०१९ या वर्षभराच्या कालावधीत एकूण ३ वेळा अचानक मोहीम तपासणी राबवली होती.
त्यात एकूण ४५ पी.यू.सी सेंटरची तपासणी केली. सदरची तपासणी करत असताना अचानकपणे सेंटरवर जाऊन नियमाप्रमाणे काम  होतं की नाही याची खात्री करण्यात आली . यातील ४५ पैकी १९ सेंटर चालकांकडून विहित नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले.
यामध्ये काही काही सेंटर्सने वाहन तपासणी न करता प्रमाणपत्र दिल्याचे निदर्शनास आले . १९ सेंटर्स पैकी १५ पीयूसी सेंटर धारकांचे अधिकार पत्र निलंबित करण्यात आले आहे.
तसेच उर्वरित चार सेंटर्स कडून त्यांना दिलेल्या अधिकाराचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केल्याचे आढळल्याने चार पी.यू.सी सेंटरची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
तसेच नुकतीच अशाच एका पी.यू.सी  सेंटरकडून नियमांचे उल्लंघन केल्याची बाब निदर्शनास आली असून त्या दिवशी सेंटरवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे सर्व वाहन चालकांनी रस्त्यावर वाहन चालवतांना इतर  कागदपत्रांसोबत वैध पी .यू.सी प्रमाणपत्र बाळगावे असे आवाहन अहिरे यांनी केले आहे.
वर्षभरात १४०४ वाहनांवर कारवाई 
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वायुवेग पथकामार्फत एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत एकूण १४०४ वाहने दोषी आढळले असून पी.यू.सी प्रमाणपत्राचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांकडून ७ लाख  ३७ हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय कडून ४ फेब्रुवारी २०१९ ते १० फेब्रुवारी २०१९ दरम्यान राबविण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा अभियान २०१९ अंतर्गत देखील विशेष मोहीम राबविण्यात आली होती.
आरटीओ ची करडी नजर
 पी . यु .सी. सेंटर्स  धारकांनी नियम व बंधनांचे पालन न केल्यास तसेच वाहनांची तपासणी न करता प्रमाणपत्र दिल्यास अशा पी .यु.सी सेंटरवर कडक कारवाई करण्यात येणार आहे . त्याचप्रमाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने अचानक  सेंटरची तपासणी करण्यात येणार असून यापुढे पी.यु .सी .सेंटरवर कार्यालयाची करडी नजर राहणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी सांगितले .

LEAVE A REPLY

*