राईनपाडा हत्या प्रकरण : मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत द्यावी; मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

0
धुळे | मुलांना पळविणारी टोळीच्या संशयावरुन काल (दि.१) राईनपाडा ग्रामस्थांच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या पाचही जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे. प्रत्येकी 25 लाख आणि एकाला सरकारी नोकरी मिळावी अशी नातेवाईकांची मागणी आहे.

सामोडे-पिंपळनेर रस्त्यावर पिंपळनेरपासून 1 किमी अंतरावर या गोसावी भिक्शुकांचा डेरा होता. आजही काही महिला आणि मुले येथेच आहेत.

मंगळवेढा तालुक्यातील त्यांचे नातेवाईक व काही पुढारी पिंपळनेरमध्ये पोहोचले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने तणाव निर्माण झाला आहे.

आज गृहराज्यमंत्री दीपक केसरकर धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर राईनपाडा येथे येत आहेत.

 

LEAVE A REPLY

*