5 हजार 550 स्क्रीन्सवर ट्युबलाईट प्रदर्शित

0

सलमानचा ट्युबलाईट चित्रपट शुक्रवारी एकाच वेळी जगभरातल्या 5 हजार 550 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे.

न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवरही ट्युबलाईट सिनेमाचं पोस्टर लावण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे टाईम्स स्क्वेअरवर लागलेलं हे पहिलंच भारतीय चित्रपटाचं पोस्टर ठरलं आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी, पहिल्या (लाँग) वीकेंडला ट्युबलाईट कमाईचे किती आकडे गाठतो, याकडे चाहत्यांसह सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भारतातील 4 हजार 350 तर अमेरिकेतील 1200 स्क्रीन्सवर ट्युबलाईट रिलीज होणार आहे.

अमेरिकेत बाहुबली 2 ला 1100 स्क्रीन्स मिळाल्या होत्या.

अमेरिकेतील ट्युबलाईटच्या प्रमोशनलाही सुरुवात झाली आहे. साहजिकच ट्युबलाईट बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड मोडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कबीर खान दिग्दर्शित ट्युबलाईटमध्ये सलमानसोबत त्याचा भाऊ सोहेल खान, चिनी अभिनेता झूझू आणि मातिन रे तंगू या बालकलाकाराची मुख्य भूमिका आहे.

गेल्या वर्षी ईदला ‘सुलतान’ प्रदर्शित झाला होता. तब्बल वर्षभरानंतर फॅन्सना सलमानचं मोठ्या पडद्यावर दर्शन घडणार आहे.

LEAVE A REPLY

*