4 जी स्पीडमध्ये भारत आता पाकिस्तान, श्रीलंकेपेक्षा मागे, जगात 74 व्या स्थानावर!

0
भारतामध्ये हाय स्पीड इंटरनेट द्यायचा टेलिकॉम कंपन्यांचा दावा पोकळ ठरताना दिसत आहे.
4G इंटरनेटच्या स्पीडच्या शर्यतीत भारत आता पाकिस्तान आणि श्रीलंकेपेक्षा मागे आहे.
अनेक क्षेत्रात भारताच्या कित्येक पट मागे असलेले पाकिस्तान आणि श्रीलंका हे देश 4G  इंटरनेट सेवेच्या बाबतीत भारतापेक्षा पुढे गेले आहेत.
भारतात 4G  इंटरनेट डाऊनलोड स्पीडची सरासरी 5.1 Mbps इतकी आहे. जगाच्या इंटरनेट सरासरीपेक्षा ही सरासरी एक-तृतीयांश पेक्षाही कमी आहे. जागतिक स्तरावर 3G इंटरनेटची सरासरी 4.4 mbps इतकी असून भारतातील ‘4G’ चा स्पीड यापेक्षा फक्त 0.7 mbps नं अधिक आहे. त्याचवेळी जगातील ‘4G’ इंटरनेट स्पीडची सरासरी तब्बल 16.2Mbps इतकी आहे.
इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारत जगात 74 व्या स्थानावर आहे.
भारतापेक्षा पाकिस्तान आणि  श्रीलंका हे देश  पुढे आहेत.
४ जी इंटरनेटच्या स्पीडमध्ये सिंगापूर पहिल्या स्थानावर आहे, तर दक्षिण कोरियाचा दुसरा क्रमांक लागतो.
ट्रायच्या माहितीनुसार, देशात काही ठिकाणी  थ्रीजी स्पीड 10 kbps पेक्षाही कमी आहे.
तसंच देशातील इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये गेल्या 6 महिन्यांमध्ये 1 मेगाबाइट प्रति सेकंदपेक्षाही अधिक घट झाली आहे, असं  ट्रायने एका अहवालात म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

*