खासगी क्षेत्रालाही मद्यार्क निर्मितीचे परवाने

0

 

सहकारी साखर कारखानदारीशी स्पर्धा, मळीचे भाव वाढणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – सध्या केवळ साखर कारखाने व केवळ स्वतःच्या प्रयोजनासाठीच मद्यार्क निर्मिती व विक्री करण्याची परवानगी देण्यात येत होती. पण आता यापुढे खासगी क्षेत्रालाही मळीपासून मद्यार्क, उसाच्या रसापासून मद्यार्क आणि जलरहित मद्यार्क निर्मिती व विक्री करता येणार आहे. याबाबतचे गृह विभागाने सुधारित धोरण जाहिर केल्याने या क्षेत्रात यापुढे खासगी व्यक्तींकडून स्पर्धा वाढणार असल्याने याचा फटका सहकारी कारखान्यांना बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, या नव्या धोरणामुळे मळीला मागणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्याचा फायदा काही प्रमाणात शेतकर्‍यांना होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.याबाबतचे परिपत्रक त्यांनी काल जारी केले आहे.

 

महाराष्ट्र डिस्टीलेशन ऑफ स्पिरीट अ‍ॅन्ड मॅन्युफॅक्चर ऑफ पोटेबल लिकर रूल्स, 1966 च्या नियमातील तरतुदीनुसार, राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना मळीपासून औद्योगिक तसेच पेय मद्य निमिर्र्तीसाठी, मद्यार्काची निर्मिती व विक्री करण्यासाठी आसवनी उभारण्याची परवानगी देण्याचे शासनाचे धोरण होते. 2003 अन्वये सुधारित धोरणानुसार, सदर धोरण कायम ठेवून साखर कारखाना नसणार्‍या घटकांना देखील मळीपासून औद्योगिक मद्यार्काचे उत्पादन करून केवळ स्वतःच्या औद्योगिक प्रयोजनार्थ वापरण्यासाठी आसवनी मंजूर करण्याचे धोरण कायम ठेवण्यात आले. राज्यातील आसवनीधारक सहकारी, खासगी क्षेत्रातील साखर कारखान्यांनी मागणी केल्यास त्यांना उसाच्या रसापासून मद्यार्क निर्मितीसाठी परवानगी देण्यात येऊ लागली.

 

राज्यातील मळीपासून औद्योगिक मद्यार्काचे उत्पादन करून केवळ स्वतःच्या औद्योगिक प्रयोजनार्थ वापरण्यासाठी ‘आय’ अनुज्ञप्ती प्राप्त साखर कारखाने नसणार्‍या काही घटकांकडून औद्योगिक मद्यार्क निर्मिती व विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच साखर कारखाना नसणार्‍या घटकांना इथेनॉल निर्मिती व्यतिरिक्त अन्य औद्योगिक करणास्तव उपपदार्थांची निर्मिती व विक्री करण्यास परवानगी देण्याची मागणी शासनाकडे आली. याची दखल सरकारने घेऊन अशा प्रकारची परवानगी दिल्यास साखर कारखाना नसणार्‍या घटकांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ शकेल. त्यामुळे त्याअनुशंगाने सरकारने 10 जुलै 2003 मधील परिच्छेद 2 मधील अनुक्रमांक 2 व 7 मध्ये सुधारणा केली आहे.

 

त्यानुसार साखर कारखाना नसणार्‍या पण मळीपासून मद्यार्क उत्पादन करू इच्छिणार्‍या घटकांना औद्योगिक मद्यार्काचे उत्पादन स्वतःच्या औद्योगिक प्रयोजनार्थ वापरण्यासाठी तसच अन्य औद्योगिक मद्यार्क, औषधे व सौंदर्य प्रसाधने व पेय मद्याच्या उत्पादनासाठी, मद्यार्क निर्मिती व विक्री करण्यासाठी आसवनी अनुज्ञप्ती मंजूर करण्यात यावी, असे नमूद केले आहे. आसनवी विरहित खाजगी घटकांना राज्यातून मद्यार्क खरेदी करून जलरहित मद्यार्क इथेनॉल निर्मिती व्यतितिक्त अन्य औद्योगिक कारणास्तव उपपदार्थांची निर्मिती व विक्री करण्यास मंजूरी देण्यात यावी तथापि, अशा घटकांना मद्यार्काची विक्री पेय मद्यासाठी करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

दरम्यान, मद्यार्क निर्मिती खासगी क्षेत्रासाठी खुली करण्यात आल्याने या क्षेत्रात स्पर्धा वाढणार आहे. याचा लाभ खासगी व्यक्ती, उद्योगपतींना होणार असल्याने यात खाजगी क्षेत्र पुढे जावू शकतात.कारणा त्यांना आता साखर कारखान्यांवर अवलंबून रहावे लागणार नाही. त्याचा फटका साखर कारखानदारीवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या स्पर्धेतून पुढील काळात मळीला मागणी वाढणार असल्याने भावही चांगला मिळण्याची शक्यता असून त्याचा लाभ शेतकर्‍यांना होऊ शकतो.

 

 

LEAVE A REPLY

*