अमित शहांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

0
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यात तासभर चर्चा झाली.
या सर्चेचा सविस्तर तपशील अद्याप आलेला नाही .
ठाकरे आणि शहा यांच्यात होणाऱ्या भेटीदरम्यान राष्ट्रपती निवडणूक तसेच इतर विषयांवर चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव सुचवल्याचे वृत्त आहे.
तसेच भागवतांच्या नावाला पर्याय म्हणून डॉ. स्वामिनाथन यांचे नाव सुचवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*