दार्जिलिंगमध्ये चकमकीत आयआरबीचे अधिकारी जखमी

0

दार्जिलिंगमधील सिंगमरी परिसरात गुरखा जनमुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब टाकले तसेच दगडफेक केली.

प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी अश्रुधुराचा वापर तसेच लाठीमार केला. यात अनेक जण जखमी झाले. या घटनेनंतर परिसरात लष्कर तैनात करण्यात आले आहे.

दार्जिलिंगमध्ये चकमकीत इंडिया रिझव्र्ह बटालीयनचे (आयआरबी) अधिकारी किरण तमंग हे गंभीर जखमी झाल्याची माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली.

त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीस गोळीबारात गोरखा जनमुक्ती मोर्चाचे दोन जण ठार झाल्याचा दावा पोलिसांनी फेटाळून लावला.

गोरखा जनमुक्ती मोर्चाचे विनय तमांग यांनी गोळीबारात दोन कार्यकर्ते ठार झाल्याचा दावा केला होता.

LEAVE A REPLY

*