मुंबईत संजय दत्तच्या हस्ते वृक्षारोपण

0

‘भामला फाऊंडेशन’तर्फे दरवर्षी ५ जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.

२३ मे ते ५ जून या कालावधीत उपनगरात एक हजार झाडे लावण्याचा उपक्रम फाऊंडेशनच्या वतीने हाती घेण्यात आला आहे.

शुक्रवारी अभिनेता संजय दत्त यांच्या हस्ते वांद्रे येथील बृहन्मुंबई महापालिका उद्यानात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.

वृक्षारोपणाच्या उपक्रमाची सुरुवात २३ मे रोजी हिंदी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली होती.

वांद्रे येथील अग्निशमन दलाच्या शेजारी असणाऱ्या बृहन्मुंबई महापालिका उद्यानात दत्त यांनी वृक्षारोपण केले. या वेळी संजय दत्त यांची पत्नी मान्यता आणि दोन मुले उपस्थित होती. या आधी अर्जुन रामपाल आणि सनी लिओनी यांच्या हस्ते वांद्रे येथील जॉगर्स पार्कमध्ये वृक्षारोपण करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

*