विवाहितेचा छळ : 12 जणांविरुद्ध गुन्हा

0
धुळे / व्यवसायासाठी 50 हजार रुपये आणावे या कारणावरून विवाहितेचा सासरी छळ करण्यात आला. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या विषयी अफसानाबानो इस्माईल धोबी (26) रा. सरदारनगर, मरीमाता भिलाटी, देवपूर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, देवपुरातील हाजी बदलू सरदार नगर येथील निवासस्थानी लग्नानंतर चार महिन्यापासून ते 13 डिसेंबर 2016 पर्यंत पती इस्माईल सलीम धोबी, सासरे सलीम धोबी, सासू सईदा सलीम धोबी, जेठ जाफर सलीम धोबी, जावेद सलीम धोबी, इरफान सलीम धोबी, रिजवान सलीम धोबी, जेठाणी बुशरा जाफर धोबी, जुलेखा जावेद धोबी, मोना इरफान धोबी (रा. हाजी बदलू सरदार नगर, देवपूर, नंदोई शरीफ धोबी, नणंद नौशादबी शरीफ धोबी (रा. अंबिकानगर, कबीरगंज, धुळे) यांनी शिवीगाळ करत मारहाण केली.
प्रेमविवाह असल्याने माहेरून व्यवसायासाठी 50 हजार रुपये आणावे या कारणावरून शारीरिक, मानसिक छळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
त्यानुसार देवपूर पोलिस ठाण्यात 12 जणांविरुद्ध भादंवि कलम 498 अ, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक उपनिरीक्षक एफ.आय. शेख करीत आहेत.

दोन गटात हाणामारी – शिंदखेडा तालुक्यातील कर्ले गावात किरकोळ वादातून हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून दोंडाईचा पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात प्रवीण अशोक शिंदे (35) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

रात्री 10 वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा घरासमोर टायर फिरवत असताना त्यास बोलल्याबाबत विचारणा केल्याच्या कारणावरून दादा राजू चव्हाण, दीपक चुनीलाल देवरे (रा.कर्ले) या दोघांनी प्रवीण शिंदे यांना हाताबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली. यावरून या दोघांविरुद्ध भादंवि कलम 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसर्‍या बाजूकडून वंदनाबाई संजय चव्हाण (45) रा. कर्ले यांनी तक्रार दिली. त्यात म्हटले आहे की, रात्री वाजेच्या सुमारास वंदनाबाई चव्हाण यांच्या मुलाने प्रवीण शिंदे यांच्या मुलास रात्री टायर फिरवू नकोस, असे सांगितल्याचा राग येऊन प्रवीण शिंदेसह शोभाबाई प्रवीण शिंदे, विमलबाई अशोक शिंदे, विलास प्रकाश चव्हाण (रा. कर्ले) या चौघांनी महिलेसह दोघांना हाताबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली. यावरून वरील दोघांविरुद्ध भादंवि कलम 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकास मारहाण – मागील भांडणाची कुरात काढून एका दुकानदाराला चार जणांनी मारहाण केली. अंजार जरार मलीक (वय 30), रा.गुलाब हाजी नगर, देवपूर, धुळे असे मारहाण झालेल्या दुकानदाराचे नाव आहे.

LEAVE A REPLY

*