Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : संशयित रुग्णांची वाढलेली संख्या ठरतेय डोकेदुखी; एकाच दिवशी ४६ दाखल

Share

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरातील करोना बाधीतांच्या आकड्यात गेल्या दोन तीन दिवसात वाढला असुन हा आकडा 45 पर्यत गेला आहे. यापैकी 18 जण बरे झाले असले तरी संशयितांचा आकडा वाढता आहे. शुक्रवारी (दि.15) शहरातून 46 संशयित उपचारासाठी दाखल झाले असुन आता महापालिका क्षेत्रातील उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या 136 इतकी झाली आहे.

शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्या 27 असुन याभागातील करोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अति जोखमीच्या व्यक्तींची संख्या 442 इतकी झाली असुन यातील पाच प्रतिबंधीत क्षेत्राचा सर्व्हे पुर्ण झाला आहे. नाशिक शहरातील करोना बाधीतांचा आकडा 45 इतका असुन शुक्रवारपर्यत 18 जण बरे होऊन घरी गेले आहे. नाशिक शहरात महिनाभरात करोनाची 30 प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर झाल्यानंतर यातील 3 भागाचा 14 दिवसांचा सर्व्हेक्षण पुर्ण झाल्याने ते प्रतिबंधीत क्षेत्राच्या यादीतून वगळण्यात आले आहे.

करोना बाधीत भागातून आलेल्याची संख्या 1421 झाली असुन यातील 815 जणांचा देखरेखीखालील 14 दिवसाचा कालावधी पुर्ण झाला आहे. आत्तापर्यत शहरातील रुग्णालयात 1203 संशयितांना दाखल करण्यात आल्यानंतर उपचार झाल्यानंतर 1163 जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. शुक्रवारपर्यत उपचार होऊन महापालिका क्षेत्रातील 37 आणि खाजगी 8 असे एकुण 45 करोना बाधीत आज मनपा रग्णालय व खाजगी रुग्णालयातील संशयितांच्या घशातील स्त्रावाचे पाठविण्यात आलेल्या (महापालिका, खाजगी रुग्णालयातील व मनपा क्षेत्राबाहेरील )1203 नमुन्यापैकी 881 अहवाल निगेटिव्ह आले आहे.

मंगळवारपर्यत शहरातील 27 प्रतिबंधीत क्षेत्रात करोना बाधीतांच्या संपर्कात आलेल्यात 174 अति जोखमीच्या आणि 643 कमी जोखमीच्या व्यक्ती चौकशीत समोर आल्या आहे.


शहरात 27 प्रतिबंधीत क्षेत्रातील आजची स्थिती (कंसात अति जोखमीच्या व्यक्ती, कमी जोखमीच्या व्यक्ती व करोना रुग्ण )

 • गोविंदनगर (0) (21) (1)
 • नवश्या गणपती (0) (10) (1)
 • धोंगडेनगर (0) (38) (2)
 • बजरंगवाडी (0) (12) (1)
 • संजीवनगर (0) (105) (5)
 • म्हसरुळ वृंदावनगर (5) (27) (1)
 • सावतानगर (न. ना.) (8) (0) (1)
 • उत्तमनगर (न. ना.) (19) (7) (1)
 • पाथर्डी फाटा मालपाणी सेफ्रॉन (7) (18) (2)
 • सातपूर कॉलनी (25) (220) (8)
 • वृंदावन कॉलनी जनरल वैद्यनगर (5) (22) (1)
 • बजरंगवाडी (भाग दुसरा) (18) (20) (1)
 • शांतीनिकेतन चौक (2) (23) (1)
 • माणेक्षानगर द्वारका (6) (20) (1)
 • समतानगर टाकळीरोड (2) (13) (1)
 • पाटीलनगर (3) (11) (2)
 • हनुमान चौक (29) (13) (1)
 • जाधव संकुल (0) (14) (1)
 • हिरावाडी (3) (0) (1)
 • श्रीकृष्ण कॉलनी (4) (1) (1)
 • इंदिरानगर (13) (16) (1)
 • तारवालानगर (9) (21) (1)
 • आयोध्यानगरी हिरावाडी (1) (0) (0)
 • कोणार्कनगर – 2 (1) (0) (1)
 • सागर व्हिलेज धात्रक फाटा (1) (0) (1)
 • हरिदर्शन अर्पा. धात्रक फाटा (4) (0) (1)
 • सिन्नर फाटा ना. रोड (8) (11) (1)

नाशिक मनपा करोना स्थिती

एकुण पॉझिटीव्ह – 39

पुर्ण बरे झालेले – 9

मृत्यु – 2

उपचार घेत असलेले – 231

प्रलंबीत अहवाल – 122

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!