सावाना निवडणूक : आज होणार माघार

0

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीसाठीची छाननीप्रक्रिया पार पडल्यानंतर आज दिनांक 19 मार्च 2017 रोजी अर्ज माघारीचा दिवस आहे. यात कोणकोण अर्ज माघार घेणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवाारांचे चित्र स्पष्ट होणार आहे.

दरम्यान सावाना अध्यक्षपदासाठीचा सुरेश गायधनी यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. तर उपाध्यक्षपदासाठीचे यशवंत पाटील, धनंजय बेळे, भालचंद्र वाघ यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. याशिवाय कार्यकारिणी मंडळ सदस्यासाठीचे 12 अर्ज अवैध ठरले. दरम्यान कार्यकारिणी मंडळासाठी एकूण 79 जणांचे अर्ज वैध ठरले. रिंगणात असलेल्या आजी माजी सदस्यांकडून पॅनलचीही घोषणा करण्यात आली. 175 वर्षांची परंपरा असलेली व जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेली ही संस्था गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक गैरव्यवहारामुळे गाजत आहे. त्यातच सावानाच्या कार्यकारी मंडळाचा कालावधी 5 मार्च रोजी संपल्याने निवडणूक जाहीर झाली.

एरवी या निवडणुकीत 50 उमेदवारी अर्जांची विक्री होणेही मुश्कील असताना, यंदा मात्र तब्बल 114 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यातच दररोज निरनिराळ्या बाबी, आरोप-प्रत्यारोप समोर येत असल्याने या निवडणुकीत दिवसेंदिवस रंग भरले जात होते. 7 ते 13 मार्चदरम्यान अर्जविक्री व स्वीकृतीची मुदत होती. त्यानंतर गुरूवारी अर्ज छाननी झाली व आता रविवारी माघारीचा दिवस असणार आहे.

LEAVE A REPLY

*