उमवित ३० व ३१ मार्च रोजी हिंदी विभागातर्फे आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्र

0
जळगाव  :  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा हिन्दी विभाग व विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 30 व 31 मार्च, 2017 रोजी संत साहित्य : आधुनातन आयाम या विषयावर आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
चर्चा सत्राचे उद्घाटन 30 मार्च रोजी सकाळी 10 वाजता कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी डॉ.जोगेन्द्रसिंह बीसेन (अधिष्ठाता, कला शाखा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड) व डॉ. केशव तुपे, सहसंचालक, उच्च व तंत्रशिक्षण, जळगाव विभाग यांची प्रमुख उपस्थिती राहील.
दिनांक 30 रोजी  डॉ.वेदकुमार वेदांलकर यांची डॉ.सुधाकर शेंडगे, डॉ.विश्वाधार देशमुख हे मुलाखत घेतील. दुपार सत्रात निबंध वाचन होईल तसेच डॉ.श्यामसुंदर दुबे हे संत साहित्य : आधुनातन आयाम या विषयावर व्याख्यान देतील अध्यक्षस्थानी मधुभाई कुलकर्णी हे असणार आहेत.
31 मार्च रोजी समाधान महाराज हे संत साहित्यातील नव-नवीन प्रवाहांच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहेत यानंतर संत साहित्यातील वौज्ञानिक दृष्टिकोन, प्रगतीशील चिंतन, पर्यावरण चेतना, संताचे व्यवस्थापन कौशल्य, संवाद कौशल्य, समुह व्यवस्थापन, संतांचे अर्थनिती विषयक विचार, संतांच्या विचारातील आधुनिकता व प्रासंगिकता, कालजयी संत परंपरा, संत साहित्यातील सामाजिक समरसता बोध, संतांचा स्त्री विषयक प्रगतीशिल दृष्टीकोन या विषयावर डॉ.नरेश मिश्र (हरियाणा), डॉ.अनिल जौन (राजस्थान), डॉ.शुभदा वांजपे (तेलंगाणा), डॉ.सतिश बडवे (औरंगाबाद) चर्चा करतील. दुपारच्या सत्रात डॉ.गिरिश्वर मिश्र (कुलगुरू, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, वर्धा ), प्रा.पी.पी.माहुलीकर (संचालक, बीसीयुडी) व डॉ. मधु खराटे यांच्या अध्यक्षतेखाली समारोप होईल.
या चर्चा सत्रात कोणत्याही विद्याशाखाचे विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक सहभाग घेवू शकतील तसेच आपला शोध निंबध गोषवाज्यासह दिनांक 25 मार्च, 2015 पर्यंत डॉ. सुनील कुलकर्णी, हिंदी विभागप्रमुख, भाषा अभ्यास व प्रशाळा व संशोधन केंद्र, उ.म.वि जळगाव या पत्त्यावर अथवा sbkulkarni@nmu.ac.in  या ई-मेल वर पाठविण्याचे आवाहन संयोजक डॉ.सुनील कुलकर्णी, संचालक डॉ.म.सु.पगारे, भाषा अभ्यास प्रशाळा, डॉ. मुक्ता महाजन, डॉ.आशुतोष पाटील, डॉ.शोभा शिंदे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*