Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यात दुपारी तीन वाजेपर्यंत ४५.३९ टक्के मतदान

Share

नाशिक | प्रतिनिधी 

सकाळपासून संथ सुरुवात झालेल्या मतदानाची टक्केवारी दुपारी तीन वाजेपर्यंत ४५ टक्क्यांपर्यंत राहिल्याने यंदा मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, अखेरचे काही तास शिल्लक आहेत तोवर आपणही घरातून बाहेर पडून मतदानाचा हक्क बजवा असे आवाहन मतदारांना करण्यात येत आहे.

आज सकाळी पहिल्या तासांत म्हणजेच सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत बोटावर मोजण्याइतक्याच मतदारांनी मतदान केले होते. त्यानंतर पुढील दोन तासांत मतदानाचा टक्का काहीसा वाढला, उमेदवारांसह कार्यकर्त्यांची गर्दी बूथ परिसरात व्हायला लागली.

दुपारी काही भागात मतदारांच्या रांगा लागल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत भर पडली. मात्र, दुपारी पुन्हा मतदारांनी बूथकडे पाठ फिरवल्याने तीन वाजले तरी मतदारांची सरासरी पन्नास टक्केही ओलांडली गेली नाही.

मतदानाला अवघे अखेरचे दोन तास शिल्लक असताना मतदान पन्नास टक्क्याच्या आत राहिल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्यासाठी बाहेर पडा असे आवाहन केले जात आहे.

जिल्ह्यातील १५ मतदार संघातील एकूण टक्केवारी 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!