Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशलसीकरणवर सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, केंद्राने दिली ४४ कोटी लसींची ऑर्डर

लसीकरणवर सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, केंद्राने दिली ४४ कोटी लसींची ऑर्डर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी १८ ते ४४ वयोगटासाठी देखील मोफत लसीकरण (Vaccine Policy) करण्याची घोषणा केली. ही जबाबदारी केंद्र सरकारची असण्याचे जाहीर केले. त्याचा दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारने तब्बल ७४ कोटी डोसची ऑर्डर केंद्र सरकारने दिली आहे.

उद्धव ठाकरेंनी मोदींकडे शिफारस केलेले बीड पीक विम्याच मॉडेल काय आहे?

- Advertisement -

कोविशिल्ड, कोवॅक्सिन या लसींचा यात समावेश आहे. निती आयोगाचे आरोग्यविषयक सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी ही माहिती दिली. तसेच या लसींसाठी ३० टक्के रक्कमही शासनाने कंपन्यांकडे आगाऊ रक्कम (advance) म्हणून दिली आहे. ४४ कोटींच्या ऑडरमध्ये कोवीशील्ड २५ कोटी कोवैक्सिन १९ कोटी आहे.

केंद्र शासन आता लस खरेदी करून ती राज्य सरकारांना पुरवणार आहे. एकूण ७५ टक्के लसींचे डोस केंद्र सरकार तर २५ टक्के लसीचे डोस हे खासगी क्षेत्रामध्ये विक्री होतील अशी देखील घोषणा पंतप्रधानांनी केली होती. त्यानुसार आता केंद्र सरकारने मोफत लसीकरणाची तयारी सुरू केली असून त्यासाठी लसीच्या तब्बल ४४ कोटी डोसची ऑर्डर केंद्र सरकारने दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या