Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : वशिकरण बाबाचा ४३ महिलांना कोट्यवधीचा गंडा; देशासह न्युझीलंड, कँनडातील महिलांचा समावेश

Share

नाशिक | प्रतिनिधी 

खाजगी जीवनात आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी स्वतःला वशीकरण स्पेशालीस्ट समजून घेणाऱ्या वशीकरण बाबाने देशविदेशातील ४३ महिलांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे गंडा घातलेल्या महिलांमध्ये न्युझीलंड, कँनडातील महिलांही समावेश असून वेबसाईटच्या माध्यमातून महिलांशी संपर्क साधून व्हाईस चेंजर अपच्या माध्यमातून महिलांना गंडा घातला जात होता.

पंडित रुधर शर्मा असे या वशीकरण बाबाचे नाव आहे. फिर्यादी महिलेच्या खाजगी जीवनात अडचणी आल्यामुळे महिला वशीकरणाचा शोध गुगलवर घेत होती. याच वेळी या महिलेला नाशिकमधील व्ही. एन. नाईक कॉलनी, पंडित नगर येथे राहणाऱ्या शर्मा याचा पत्ता मिळाला. पत्त्याचा शोध घेतला असता तिथे असा कुन्हीही व्यक्ती राहत नसल्याचे समजले. या महिलेने त्यास 09982267940 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला. यावेळी शर्मा यास या महिलेने खाजगी जीवनातील अडचणी सांगितल्या.

यावर ७ हजार ५०० रुपये आणि वशीकरणाचे साहित्य घेण्यासाठी ४० हजार रुपये स्टेट बँकेच्या खात्यात जमा करण्यास सांगितले. त्यानंतर महिलेने रक्कम ऑनलाईन खात्यात भरली.

शर्मा याने पुन्हा या महिलेला फोन करून सांगितले की तुमचे वशीकरणाचे काम थांबलेले असून यासाठी अजमेर येथील खान बाबा या व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगितले. खान बाबा याने या महिलेच्या अडचणी सोडविण्यासाठी २ लाख ४० हजार रुपये एचडीएफसी बँकेच्या खात्यात जमा करण्यास सांगितले.

त्यानंतर खान बाबा याने वशीकरणास प्रचंड अडचणी येत असून वशीकरण करून घेण्यासाठी ६ लाख रुपये जमा करण्यास सांगितले. दरम्यान, महिलेने ६ लाख रुपये जमा करण्यास असमर्थता दर्शविल्याने महिला व प्रियकराचे फोटो आपल्याकडे आहेत. वशीकरण व करणी करून महिला व तिच्या प्रियकराच्या आईवडिलांच्या जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे या महिलेच्या लक्षात आल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवराज बोरसे, उपनिरीक्षक रवींद्र देसले, संतोष काळे, राहुल जगझाप, मंगेस्वार काकूळदे, भूषण देशमुख, शमल जोशी यांच्या पथकाने दिल्ली येथे जाऊन निरज भार्गव वय २३, रा. नवी दिल्ली यास अटक केली. त्याच्या ताब्यातून ०३ मोबाईल फोन, ०२ डेबिट कार्ड जप्त करण्यात आले आहेत.

संशयित नीरज हा त्याच्या संपर्कात येणाऱ्या महिलांना पूजेच्या नावाने त्यांचे नग्न फोटो मागवीत असे. त्याच्या आधारे तो महिलांना धमकावत असल्याचा संशय पोलिसांना आहे. संशयितांनी जिल्यातील महिलांना याचप्रकारे फसविले असून महिलांनी तक्रार देण्यासाठी समोर येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

देशविदेशातील ४३ महिलांना गंडा 

संशयिताने www.panditrudharsharma.com व www.no1loveastrologer.com या दोन संकेतस्थळ तसेच गुगल माय बिझनेस यावर सहा वेगवेगळ्या नावांनी पेज तयार केलेले आढळून आले आहेत. याद्वारे देशविदेशातील ४३ महिलांना फसविण्यात आल्याचे आढळून आले आहे. व्हाईस चेंजर अपच्या आधारे सशयित महिलेच्या आवाजाने पिडीत महिलांशी संपर्क साधावयाचा.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!