Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

गोंदे महामार्ग बनला मृत्यूचा सापळा; वर्षभरात ४१ अपघाती मृत्यू

Share

बेलगाव कुऱ्हे | लक्ष्मण सोनवणे

एकट्या गोंदे रस्त्यावर वर्षभरात वेगवेगळ्या अपघातांत ४१ जणांना मृत्यू पत्करावा लागला आहे. यात दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे.

राजूर बहुला शिवारात सतत वेगवेगळ्या प्रकारचे अपघात घडत आहेत. यात हेल्मेट नसलेल्या दुचाकी वाहनधारकांची संख्या सर्वाधिक असून ग्रामीण पोलिसांनी अधिक प्रभावीपणे हेल्मेट सक्तीची मोहीम राबवली पाहिजे अशी मागणी सुजन रहिवाश्यांकडून केली जात आहे.

मुंढेगाव ते राजूरफाटा दरम्यान वर्षभराच्या कालावधीत आतापर्यंत एकूण 242 अपघात झाले आहेत. यात 418 व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत.  सन 2019 मध्ये 16 अपघातात 14 व्यक्ती मयत झाल्या. अशा एकूण 41 व्यक्तींना प्राण गमवावा लागला आहे.

महामार्गारील वालदेवी ते राजूरफाटा दरम्यान रायगडनगर शिवारात ठिकठिकाणी संरक्षण जाळ्या नसल्याकारणाने अपघातात वाढ झालेली दिसून येते आहे.

गोंदे दुमाला महामार्गावर नुकतीच रस्त्याची डागडुजी करण्यात आली आहे. मात्र, गतिरोधकच गायब झाल्याने वाहनधारकांना महामार्ग ओलांडताना जीवाला धोका निर्माण झाला आहे.

वाडीवऱ्हे पोलिसांना चाळीस गावांचा कारभार सांभाळावा लागतो अपुऱ्या मनुष्यबळामुळे तसेच गोंदे दुमाला येथे वाहतूक पोलीस चौकी नसल्याने अपघातात वाढ होत आहे. तसेच लेकबिल फाट्यावर महामार्ग ओलांडताना दुभाजकामधील झाडांमुळे वाहने दिसून येत नाहीत यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

जगतगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची मोफत रुग्णवाहिका जोपासतेय मानवता

‘रुग्णसेवा हीच खरी मानवसेवा आहे’ असे समजून जगतगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थानने गोंदे दुमाला या महामार्गावरील गावात २४ तास कार्यरत असलेली रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. रुग्नावाहीकेच्या चालकाची महत्वपूर्ण जबाबदारी सामान्य लोकांसाठी अविरत झटणारे निवृत्ती गुंड यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे.

अपघाताची प्राथमिक माहिती मिळताच ही रुग्णवाहिका तत्काळ त्या ठिकाणी पोहचून जखमीना शासकीय रुग्णालयात दाखल करते. पाच वर्षांत 16०० पेक्षा जास्त लोकांच्या प्राणांना जीवदान देण्यास अग्रेसर ठरलेल्या या रुग्णवाहिकेची सुरुवात २१ जून २०१२ साली झालेली आहे.  २४ तास जखमींना तातडीने उपचारार्थ पोहोच करून संस्थानाच्या रुग्णवाहिकेने नेहमीच मानवता जोपासली आहे.

भुयारी मार्ग नसल्याने अपघात वाढले

गोंदे दुमाला सारख्या सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणी भुयारी मार्गाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली आहे. फाट्यावर पोलीस चौकी नाही तसेच कायम वाहतूक पोलिसांनी नेमणूक करण्यात यावी.याबाबींमुळे अपघातास आळा बसण्यास मदत मिळेल.

-गणपत जाधव, सरपंच गोंदे दुमाला

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!