‘ट्रेक अँड क्लिनिंग’द्वारे ब्रह्मगिरीचा ४०० किलो कचरा संकलीत

0
नाशिक | अनेक ठिकाणचे पर्यटनस्थळे कचऱ्याच्या समस्येने ग्रासलेले आहेत. अनेक ठिकाणाहून आलेले पर्यटक याठिकाणी सर्वच प्रकारचा कचरा करत असल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे.

हे टाळण्यासाठी व पर्यावरण  स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी शहरातील क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रयास युवा मंच या सामाजिक संस्थेद्वारे प्रत्येक वर्षी ‘ट्रेक अँड क्लिनिंग’ हा अनोखा उपक्रम राबविला जातो.

या उपक्रमाद्वारे प्रयास टीम ट्रेक करते आणि याठीकांच्या परिसराची स्वच्छतादेखील करते. तसेच आलेल्या पर्यटकांना कचरा न करण्यासाठी जनजागृती करतात.

रविवार (दि. ९) या दिवशी ३७ स्वयंसेवकांनी ‘ब्रह्मगिरी’ ह्या ठिकाणी हा उपक्रम राबविला. या उपक्रमामध्ये सुमारे ४०० किलो कचरा जमा करण्यात आला. तेथील गिर्यारोहकांनी या उपक्रमाला दाद देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आणि कचरा गोळा करण्यास मदत केली.

या उपक्रमामध्ये प्राचार्य डॉ. के. एन. नंदूरकर, प्रा. एन. बी. गुरुळे, संगीता गुरुळे आणि चेतन नारखेडे यांचे मार्गदर्शन लाभले. उपक्रमाच्या शेवटी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा उत्साह मनोगत व्यक्त करून दाखवला.

LEAVE A REPLY

*